Upcoming MPV in India : वाहन उत्पादक निर्माता कंपनी Nissan India पुढील काही वर्षांत देशात आपली लाईनअप वाढवण्याच्या योजनांवर काम करत आहे. कंपनीने आधीच X-Trail आणि Qashqai SUV सादर केली आहे. सध्या या गाड्यांची चाचणी सुरू आहे. निसान एक्स-ट्रेल 2023 च्या मध्यात लॉन्च केली जाऊ शकते. ही कार लॉन्च झाल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरशी स्पर्धा करेल. तसेच निसान कंपनीने जाहीर केल्यानुसार आता ही कार नवीन 7-सीटर MPV आणणार आहे जी Renault Tiber वर आधारित असेल. ही कार CMF-A+ प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल.


कशी असेल नवी MPV कार?


Nissan ने अद्याप आपल्या नवीन 7-सीटर MPV बद्दल कोणतीही अधिकृत माहिती उघड केलेली नाही. पण, याला रेनॉल्ट ट्रायबर प्रमाणेच पॉवरट्रेन आणि वैशिष्ट्ये मिळणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये 1.0L, 3-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिसू शकते. हे इंजिन 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी या नवीन कारमध्ये टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्यायही देऊ शकते. यात मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळू शकतो. डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नवीन निसान 7-सीटर एमपीव्ही रेनॉल्ट टायबरपेक्षा वेगळी असेल, परंतु तरीही त्याचे काही घटक ट्रायबरसारखे असू शकतात. 


वैशिष्ट्य काय असेल?


या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, दुसरी रो रेक्लाइन, एलईडी अॅम्बियंट लाइटिंग, कीलेस एंट्री, काढता येण्याजोगा तिसरी रो, पुश-बटण स्टार्ट, मध्य आणि तिसरी रो रूफ माउंटेड एसी व्हेंट्स दिले जाऊ शकतात.


येत आहे नवीन X Trail 


Nissan ची X-Trail लवकरच बाजारात येणार आहे, या SUV ला 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, हे इंजिन सौम्य हायब्रिड किंवा मजबूत हायब्रिड टेक्नॉलॉजी वापरू शकते. सौम्य हायब्रिड व्हर्जनला 163PS पॉवर मिळेल, जी 2WD प्रणालीसह सुसज्ज असू शकते. 204PS ची शक्ती मजबूत हायब्रिड इंजिनसह उपलब्ध असेल आणि त्यात 2WD आणि AWD चा पर्याय देखील असेल. एक्स-ट्रेल 5 आणि 7-सीटिंग लेआउटच्या निवडीसह ऑफर केली जाईल. 


मारुती अर्टिगाशी स्पर्धा करू शकते


निसानची नवीन एमपीव्ही मारुती सुझुकी एर्टिगाशी स्पर्धा करू शकते, ज्यामध्ये 1.5L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Top Selling Car: 'या' भारतातील टॉप 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV आणि हॅचबॅक कार, पाहा संपूर्ण लिस्ट


Car loan Information:

Calculate Car Loan EMI