Top 5 Mileage Bikes: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनाला मागणी आहे. कारण देशातील बहुतांश लोक छोट्या आणि दैनंदिन जीवनातील कामांसाठी दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात. या सेगमेंटमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कम्युटर बाईक्सना खूप मागणी आहे. यात आज आम्ही तुम्हाला देशातील काही अशा बाईकबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या सर्वाधिक मायलेज देतात. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या बाईक्स...


Tvs Sport


Tvs Sport ला बाजारात खूप पसंती दिली जाते. या बाईकमध्ये 109.7cc BS6 इंजिन उपलब्ध आहे, जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक आहेत. ही बाईक बाजारात 3 प्रकारात आणि 7 रंगात उपलब्ध आहे. यात 10 लिटरची इंधन टाकी मिळते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 61,025 रुपयांपासून सुरू होते आणि 67,530 रुपयांपर्यंत जाते. याचा मायलेज 70 kmpl इतका आहे.


Hero HF Deluxe 


Hero HF Deluxe मध्ये 97.2cc BS6 इंजिन आहे. जे 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याच्या पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक बाजारात 5 प्रकारात आणि 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 9.1 लीटरची इंधन टाकी मिळते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 55,022 रुपये ते 67,178 रुपये आहे. ही बाईक 65 kmpl चा मायलेज देते.


Honda HP 125


Honda च्या SP 125 बाईकमध्ये 124cc BS6 इंजिन उपलब्ध आहे, जे 10.72 bhp पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याला समोर आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टम मिळते. ही बाईक बाजारात 2 प्रकारात आणि 5 रंगात उपलब्ध आहे. यात 11 लीटरची इंधन टाकी आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 83,088 रुपये ते 79,702 रुपये आहे. ही बाईक 65 kmpl चा मायलेज देते.


Honda Livo


Honda Livo 2 प्रकारात आणि 4 रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यात 109.51cc BS6 इंजिन आहे, जे 8.67 bhp पॉवर आणि 9.30 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टीमसह पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात. या बाईकमध्ये 9 लीटरची इंधन टाकी उपलब्ध आहे. याची एक्स-शोरूम किंमत 75,659 रुपये आहे. ही बाईक 58 kmpl चा मायलेज देते.


Hero Splendor Plus Xtec


स्प्लेंडर बाईकची ही अॅडव्हान्स व्हर्जन आहे, जी बाजारात 1 प्रकारात आणि 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 97.2cc BS6 इंजिन उपलब्ध आहे, जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या बाईकच्या मागील आणि पुढच्या भागात कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टमसह ड्रम ब्रेक उपलब्ध आहे. याची इंधन टाकी क्षमता 9.8 लीटर आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 76,381 रुपये आहे. ही बाईक 60 kmpl चा मायलेज देते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI