Pure EV ecoDryft Launched: भारतात इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटचा (Indian Electric Vehicle Industry) मोठा विस्तार होत आहे. यातच आता इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आणखी एक बाईक सामील झाली आहे. आज हैदराबाद येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Pure EV ने EcoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने स्वतः ही बाईक आधीच देशातील 100 हून अधिक डीलरशिपवर टेस्ट राइडिंगसाठी उपलब्ध करून दिली आहे. ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही रिव्हॉल्ट इलेक्ट्रिक बाईक RV400 LA ला टक्कर देईल. या बाईकमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.  


Pure EV ecoDryft Launched: किती आहे किंमत? 


कंपनीने Pure EV बाईक 99,999 रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत सादर केली आहे.


Pure EV ecoDryft Launched: बुकिंग सुरू 


कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक Pure EV च्या अधिकृत डीलरशिपद्वारे ही बाईक बुक करू शकतात. याचबरोबर कंपनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू करणार आहे.


Pure EV ecoDryft Launched: पॉवर ट्रेन आणि मोटर


नवीन Pure EV इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 30 kWh चा AIS 156 प्रमाणित बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 3kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेले आहे.


Pure EV ecoDryft Launched: पॉवर रेंज आणि स्पीड 


ही इलेक्ट्रिक बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 135 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते आणि 75 किमी/ताशी हाय स्पीडने धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कॉम्प्युटर बाईक म्हणून बाईकच्या डिझाइनमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच-स्पोक अलॉय व्हील आणि सिंगल-पीस सीट समाविष्ट आहे.


Pure EV ecoDryft Launched: रंग पर्याय


कंपनीने ही इलेक्ट्रिक बाईक चार रंग पर्यायसह लॉन्च केली आहे. यात ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड रंगाचा समावेश आहे.


Revolt RV400 शी करेल  स्पर्धा


Pure EV EcoDryft इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईकशी स्पर्धा करेल. Revolt RV400 ची किंमत 1.25 लाख रुपये आहे. परंतु एका पूर्ण चार्जवर यांची रेंज 80 किमी पर्यंत आहे, जी Pure EV पेक्षा कमी आहे.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI