Hero Xoom 110 Launched : दिग्गच दुचाकी निर्माता Hero MotoCorp ने भारतात आपली नवीन जबरदस्त स्कूटर लॉन्च केली आहे. Hero Xoom असं या स्कूटरचे नाव आहे. कंपनीने आपल्या या नवीन स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 68,599 रुपये इतकी ठेवली आहे. ही स्कूटर LX, VX आणि ZX या तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. याची किंमत 68,599 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 76,699 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीने लोकप्रिय Hero Maestro च्या तुलनेत याला अनेक डिझाइन आणि फीचर अपडेट दिले आहेत, ज्यामुळे नवीन मॉडेल अधिक प्रीमियम पर्याय बनते. ही 110cc स्कूटर भारतीय दुचाकी बाजारपेठेतील टीव्हीएस ज्युपिटर आणि Honda Activa Smart सारख्या सर्वोत्तम स्कूटरला आव्हान देईल. कंपनीने आपल्या नवीन Hero Xoom काय दिलं आहे खास, हे जाणून घेऊ...
Hero Xoom 110 Launched : फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Honda Xoom ला शार्प आणि Sculpted डिझाइन मिळते. ही स्कूटर ऑल-एलईडी हेडलॅम्प आणि X-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह येते. इतर डिझाइन एलिमेंट्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12-इंच अलॉय व्हील आणि बरेच काही समाविष्ट आहे. ब्लूटूथ वापरून तुम्ही डिजिटल डिस्प्ले स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती बघायला मिळेल.
याच्या टॉप-एंड व्हेरियंटमध्ये ZS मध्ये कॉर्नरिंग बेंडिंग लाइट्स मिळतात. हे सुनिश्चित करते की जेव्हा रायडर वळणाच्या दिशेने अधिक प्रकाश देण्यासाठी वळणावर झुकतो तेव्हा कॉर्नरिंग लाइट ऑटोमॅटिक सक्रिय होतात. स्कूटरचा पुढचा ऍप्रन टोकदार असतो आणि काउलिंग हँडलबारवर टर्न इंडिकेटर ठेवते. स्कूटरच्या टेललाइटलाही X पॅटर्न मिळतो. ब्रेकिंगसाठी टॉप व्हेरियंटला समोर डिस्क ब्रेक मिळतो. ऑल-न्यू 110cc स्कूटरला पॉवर देण्यासाठी 110.9cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड Fi इंजिन देण्यात आहे. जो CVT शी जोडलेला आहे. हे इंजिन 8.04bhp ची पीक पॉवर आणि 8.7Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
विक्रीत अॅक्टिव्ह टॉपवर
भारतीय स्कूटर मार्केटमधील 110cc सेगमेंट देशातील एकूण स्कूटर विक्रीमध्ये जवळपास 60 टक्के वाटा आहे. या सेगमेंटमध्ये Honda ची Activa ही सर्वात आघाडीवर आहे. हिरो झूमसह या सेगमेंटमध्ये कंपनीला आपलं स्थान बाजारात आणखी बळकट करायचं आहे. कंपनीच्या स्कूटरला बाजारात कसा प्रतिसाद मिळेल, हे पुढील काही महिन्यात समजू शकले.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI