17 Cars Discontinued In 2023: देशात 1 एप्रिल 2023 पासून नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (Real Driving Emission) नियम लागू होणार आहेत. यामुळे वाहन निर्मात्यांना त्यांच्या वाहनांचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील. याच कारणामुळे अनेक कंपन्या आपल्या गाड्या बंद करणार आहेत. चला तर जणू घेऊ कोणत्या गाड्या बंद केल्या जाऊ शकतात.


17 Cars Discontinued In 2023: या गाड्या होऊ शकतात बंद 



  • होंडा सिटी फोर्थ जनरेशन

  • होंडा सिटी फिफ्थ जनरेशन डिझेल

  • होंडा अमेझ डिझेल

  • होंडा जाझ

  • होंडा WR V

  • महिंद्रा मराझो

  • महिंद्रा अल्टुरस G4

  • महिंद्रा KUV 100

  • ह्युंदाई व्हर्ना डिझेल

  • स्कोडा ऑक्‍टिव्हा

  • स्कोडा सुपर्ब

  • टाटा अल्ट्रोझ डिझेल

  • रेनॉल्ट KWID 800

  • निसान किक्स

  • मारुती अल्टो 800

  • टोयोटा इनोव्हा क्रिस्टा पेट्रोल


Price of Cars Will Increase: गाड्यांचे वाढणार भाव 


वाहनांवर नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन उत्पादक त्यांच्या गाड्यांच्या इंजिनमध्ये बदल करतील किंवा नवीन इंजिन बनवतील. त्यामुळे खर्च वाढून त्याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 2020 मध्ये BS6 मानक इंजिन सादर केल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.


Sales of Diesel Cars Are Continuously Declining: डिझेल कारच्या विक्रीत सातत्याने होत आहे घट 


नवीन नियमांमुळे ग्राहक आता डिझेल कारला कमी पसंती दर्शवत आहेत. याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास समान आहेत. डिझेलमुळे जास्त प्रदूषण होते, डिझेल वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा जास्त आहे. याशिवाय दिल्लीसारख्या शहरात डिझेल वाहने 15 वर्षेच चालवता येतील. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कंपन्याही हळूहळू डिझेल वाहने बंद करत आहेत.


कंपन्यांना कारमध्ये करावे लागतील हे बदल



  • इंधन कार्यक्षम इंजिनांना चालना देण्याबरोबरच इंजिनमध्ये refined devices बसवली जातील. जेणेकरून कार्बन उत्सर्जन कमी करता येईल.

  • Warning system जेव्हा उत्सर्जन प्रमाणापेक्षा जास्त असेल तेव्हा तुम्हाला सावध करेल, जेणेकरून तुम्ही वेळेत सर्व्हिसिंग पूर्ण करू शकाल.

  • Refined device इंधनाचे प्रमाण देखील तपासेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI