Maruti Suzuki Electric Car:  भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. हेच लक्षात घेऊन आता आघाडीची चारचाकी उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मारुतीची पहिलीच इलेक्ट्रिक एसयूव्ही Toyota आणि Maruti यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित केली जाईल. कंपनीने मागील काही महिन्यात याच उपक्रमांतर्गत आपले अनेक मॉडेल्स बाजारात लॉन्च केले आहे.

  


काय असेल इलेक्ट्रिक कारचे नाव?  


आगामी इलेक्ट्रिक कार ही मारुतीची पहिली शून्य-उत्सर्जन कार असेल. या प्रकल्पाला कंपनीचा हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र या कारच्या प्रोडक्शन नावाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनीने याला YY8 कोडनेम दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.


ही आगामी इलेक्ट्रिक कार एसयूव्ही बॉडी स्टाईलसह येईल. कंपनी भारतीय ग्राहकांची आवड आणि गरज लक्ष घेऊन या कारची निर्मिती करत आहे. देशात याची स्पर्धा आगामी टाटाच्या पंच (इलेक्ट्रिक आवृत्ती) शी होईल. सध्या ही कर लॉन्च झालेली नाही. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी ऑटो निर्माता कंपनी आहे. असे असूनही कंपनीने अद्याप इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कोणतेही उत्पादन लाँच केलेले नाही. तर भारतीय कंपनी टाटाने टाटा नेक्सॉन ईव्हीच्या (Tata Nexon EV) आधारे या सेगमेंटमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआरच्या  (Maruti Suzuki Wagaon R)  इलेक्ट्रिक आवृत्तीची चाचणी सुरू केली आहे. ही कार बर्याच काळापासून चर्चेत आहे.


मारुतीची इलेक्ट्रिक कार कधी होणार लॉन्च?


कंपनीने अद्याप याच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याचबरोबर कारचे नाव आणि किंमत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र असे बोलले जात आहे की, 2024 मध्ये सणासुदीच्या काळात ही कार बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI