Pravaig Defy Electric Car Launch : भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता अनेक नवीन वाहन उत्पादक कंपनीही आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहे. यातच आता बेंगळुरू येथील स्टार्टअप Pravaig Dynamics ने  आपली पहिली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Pravaig Defy भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 39.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. कंपनीने याची बुकिंगही सुरु केली आहे. ग्राहक 51,000 रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. कंपनी एप्रिल 2023 पासून भारतात Pravaig Defy ची डिलिव्हरी सुरू करणार असल्याची माहिती आहे. Praveg Defy ही एक मोठ्या आकाराची मस्क्यूलर इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जी अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


कंपनीने Defy Electric SUV ला अतिशय आधुनिक डिझाइन दिली आहे. याला स्टायलिश बनवण्यासाठी ही कार ड्युअल टोन रूफमध्ये सादर करण्यात आली आहे. SUV ला LED हेडलाइट आणि LED टेल लाईट सह मोठा फ्रंट बंपर मिळतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर कंपनीने या SUV मध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास फीचर्स दिले आहेत. 15 इंचाचा लॅपटॉप केबिनमध्ये ठेवण्यासाठी यात जागा देण्यात आली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरण चार्ज करण्यासाठी 220-व्होल्टचे सॉकेटही देण्यात आले आहे. केबिनमध्ये PM 2.5 एअर फिल्टर देखील आहे. जो तुम्हाला ताजी हवा देत राहील. यात ऑन-बोर्ड वायफाय, पीएम 2.5 एअर फिल्टर, 15.6-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मिररलिंक सपोर्ट यासारखे हाय-टेक फीचर्स देण्यात आले आहेत.


बॅटरी 


SUV 90 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येते. यात ड्युअल मोटर सेटअपसह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळते. कंपनीने दावा केला आहे की, ही इलेक्ट्रिक SUV पूर्ण चार्ज केल्यावर 504 किलोमीटरची रेंज देऊ शकते. तर याची टॉप स्पीड 210 किमी/तास आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही SUV केवळ 30 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. इतकंच नाही तर या एसयूव्हीमध्ये बसवण्यात आलेली बॅटरी 10 लाख किलोमीटरपर्यंत टिकू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. ही एसयूव्ही सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मजबूत आहे. ही SUV 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह येते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ram Kapoor : राम कपूरने खरेदी केली 'Ferrari Portofino' कार; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल


Car loan Information:

Calculate Car Loan EMI