Scorpio N Review: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राची Scorpio भारतात खूप पसंत केली जात. कांपीच्या Scorpio N ला देशात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळेच या कारची वेटिंग लिस्टही खूप मोठी आहे. याच्या लॉन्चच्या वेळी आम्ही याचा डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट चालवता, जो आम्हाला खूप आवडला होता. मात्र याचा पेट्रोल व्हर्जन हा डिझेलपेक्षा चांगला पर्याय आहे. याची परफॉर्मन्स आणि मायलेजचा अनुभव घेण्यासाठी आम्ही काही काळ ही गाडी चालवली. ही मोठ्या आकाराची एसयूव्ही खूपच प्रीमियम दिसते. तीच आतली केबिन बरीच मोठी असण्याव्यतिरिक्त स्कॉर्पिओ क्लासिकपेक्षा खूप वेगळी आहे. केबिनची डिझाइन अतिशय चांगल्या प्रकारे केली गेली आहे. याची प्रीमियम किंमत दाखवण्यासाठी यात फीचर्सही खूप जास्त देण्यात आले आहेत. यात सनरूफ, कनेक्टेड कार टेक, प्रीमियम ऑडिओ सिस्टम, फ्रंट/रिअर पार्किंग सेन्सर्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.


इंजिन आणि परफॉर्मन्स 


पेट्रोल व्हर्जन 2.0L टर्बो युनिटद्वारे समर्थित आहे. जे 200bhp आणि 380Nm पीक जनरेट करते. आम्ही टेस्ट केलेली कार 6-स्पीड ऑटोमॅटिकशी जुळलेली आहे. पेट्रोल इंजिन खूप मोठे आहे. स्कॉर्पिओ एन एक मोठी आणि जड लॅण्डर-फ्रेम एसयूव्ही आहे, परंतु याचे पेट्रोल इंजिन याला अधिक जबरदस्त बनवते. याचा डायव्हिंग अनुभव खूपच छान आहे. यात ऑटोमॅटिक व्हर्जनला नेहमीचे क्विक शिफ्टिंग डबल क्लच मिळत नाही. पण टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक मिळतो, जे इतक्या मोठ्या SUV साठी चांगले काम करते. एकंदरीत, पेट्रोल व्हर्जनची परफॉर्मन्स  खूपच आश्चर्यकारक होती. 


मायलेज 


प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, याचे मायलेज किती आहे? मोठ्या पेट्रोल इंजिनसह जड SUV कडून तुम्‍हाला जे अपेक्षित आहे तेच आहे. शहरातील मायलेज सुमारे 7/8 kmpl आहे. तर हायवेवर आकडेवारीतही फारशी सुधारणा दिसून येत नाही. ही कार धावताना जास्त आवाज करत नाही. यामुळे ड्रायव्हिंग करताना शांतात जाणवते. ऑफ-रोडसाठी देखील ही गाडी खूप जबरदस्त आहे. आम्हाला या SUV चा परफॉर्मन्स, लूक, क्वालिटी खूप आवडली, पण याचे मायलेज, कॅमेरा डिस्प्ले, ड्राइव्ह मोड याची कमतरता जाणवते. 


इतर महत्वाची बातमी: 


2022 Maruti Suzuki Eeco: तुमची इको सिस्टिम सांभाळणार मारुतीची 'ही' कार; मोठ्या कुटुंबासाठी आहे बेस्ट, किंमत फक्त 5.13 लाख


Car loan Information:

Calculate Car Loan EMI