Free Ola Electric Scooter: तुम्हालाही ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोफत हवी आहे का? तर ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविश अग्रवाल यांची ही ऑफर तुम्हाला उपयोगी पडू शकते. भाविश अग्रवाल हे आपल्या 10 ग्राहकांना तपकिरी रंगाची ओला स्कूटर पूर्णपणे मोफत देणार आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला हे काम करावे लागणार आहे.


भाविश यांनी ट्वीट करून दिली माहिती 


भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांची कंपनी 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर देईल, जे एका चार्जमध्ये 200 किमीची रेंज पूर्ण करतील. कंपनीला असे दोन रायडर्स मिळाले आहेत. यापैकी एका रायडरने MoveOS2 वर आणि एकाने 1.0.16 वर ही कामगिरी केली आहे, म्हणजेच कोणताही रायडर हा पराक्रम करू शकतो.


जूनमध्ये फ्युचरफॅक्टरी येथे डिलिव्हरी उपलब्ध होईल


यासोबत भाविश अग्रवाल म्हणाले की, जो कोणी विजेता होईल, त्यांना जूनमध्ये कंपनी ओला फ्युचरफॅक्टरीमध्ये बोलावले जाईल आणि तेथे त्यांना ओला स्कूटरची मोफत डिलिव्हरी दिली जाईल.


गेल्या काही काळापासून अनेक ग्राहकांनी ओला स्कूटरबाबत सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये कंपनीच्या स्कूटरच्या रेंज आणि रिव्हर्स फीचरबाबत सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेऊन कंपनीने नुकतीच आपल्या स्कूटरसाठी MoveOS2 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली आहे. याशिवाय पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटनेमुळेही कंपनीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या घटनेनंतर कंपनीला 1,411 ओला स्कूटरही परत मागवाव्या लागल्या.


नवीन खरेदी विंडो ओपन 


21 मे पासून ओला स्कूटरच्या खरेदीची विंडो पुन्हा सुरू झाली आहे. याआधी 17 आणि 18 मार्च रोजी ओलाची विक्री सुरू करण्यात आली होती. यावेळी कंपनीने ओला स्कूटरच्या किमतीत 10,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी! कंपनीने उचललं मोठं पाऊल!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI