Discount on Maruti Suzuki Alto: देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी ऑगस्ट महिन्यात आपल्या एंट्री-लेव्हल कार अल्टोवर 18,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही ऑफर कारच्या सर्व प्रकारांवर लागू आहे. मात्र कंपनीच्या CNG कारवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


Maruti Suzuki Alto मिळत आहे ही सूट 


कंपनीकडून मारुती अल्टोच्या स्टँडर्ड मॉडेलवर 5,000 रुपयांचा रोख बोनस दिला जात आहे. या मॉडेलवर इतर कोणतीही ऑफर नाही. कंपनी आपल्या मारुती अल्टोच्या वरील-स्टँडर्ड मॉडेल्सवर रु. 8,000 ची रोख सवलत आणि रु. 10,000 पर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे.


किंमत 


मारुती सुझुकी या एंट्री-लेव्हल कारची प्रारंभिक किंमत 3.39 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे. तर याच्या टॉप स्पेक प्रकार 4.42 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या कारचे CNG मॉडेल देखील उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.03 लाख रुपये आहे.


Maruti Suzuki Alto K10 लवकरच होणार लॉन्च 


मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन कार Alto K10 लॉन्च करणार आहे. कंपनीने याची बुकिंग देखील सुरू केली आहे. ग्राहक 11,000 रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. ही कार अल्टो 800 सोबत विकली जाईल. यात दोन प्रकारचे पेट्रोल इंजिन येण्याची अपेक्षा आहे. ज्याची अंदाजे किंमत 4.15 लाख ते 4.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.


Maruti Suzuki Alto इंजिन 


मारुती अल्टोमध्ये 796 cc पॉवरट्रेन मिळते. जे 48 PS कमाल पॉवर आणि 69 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.


मायलेज 


ही कार पेट्रोल इंजिनसह 22.05 kmpl चा मायलेज देते, तर 31.59 km/kg चा मायलेज तिच्या CNG मॉडेलवर मिळतो.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI