Ather Energy Showroom In Thane : सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी असलेल्या एथर एनर्जीने ठाण्यात आपले नवीन शोरूम उघडलं आहे. नवीन अथर स्पेस रिटेल आउटलेट पाच पाखडी, ठाणे येथे उघडण्यात आले आहे. नवीन एथर स्पेस स्टोअरमध्ये, ग्राहक Ather 450X आणि 450 Plus इलेक्ट्रिक स्कूटर्सची टेस्ट ड्राइव्ह बुक करू शकतात. भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्सची वेगाने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी एथर एनर्जी नवीन शहरांमध्ये विस्तारत करत आहे.
Ather 450X ही कंपनीची फ्लॅगशिप स्कूटर आहे. ज्याची किंमत 1,43,136 रुपये आहे. तसेच याचे बेस व्हेरिएंट 450 Plus ची किंमत 1,24,126 रुपये आहे. सर्व किमती FAME-2 सबसिडी एक्स-शोरूम, मुंबईच्या आहेत. फ्लॅगशिप स्कूटर Ather 450X बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 2.61 kWh ची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही स्कूटर फुल चार्ज केल्यानंतर 85 किलोमीटरची रेंज देते. यामध्ये मल्टिपल रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत, ज्यातून गरजेनुसार वेग आणि परफॉर्मन्स बदलता येतो. Ather 450X 80 kmph च्या टॉप स्पीडने चालवता येते. ही स्कूटर 26 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते, जे 350 सीसी बाईकच्या समतुल्य आहे. ही स्कूटर 0-60 किमी/ताशी 6.50 सेकंदात वेग पकडते.
अलीकडेच, कंपनीने Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) लाँच केले आहे. हे वैशिष्ट्य स्कूटरवर अॅक्सेसरी म्हणून उपलब्ध असेल. ज्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त किंमत मोजावी लागेल. Ather 450X मधील TPMS साठी ग्राहकांना 5,000 रुपयांची अतिरिक्त किंमत मोजावी लागेल. एथर एनर्जी ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी आहे, जी तिच्या वाहनांमध्ये ही प्रणाली ऑफर करते. प्रीमियम स्कूटर रेंजमध्ये येणाऱ्या ओलाच्या S1 आणि S1 Pro स्कूटरमध्ये TPMS उपलब्ध नाही. स्कूटरमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये प्रदान करण्याच्या बाबतीत एथर एनर्जी ओला इलेक्ट्रिकपेक्षा पुढे असल्याचे दिसते.
Ather ने भारतीय शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीच्या EV चार्जिंग प्लेयर मॅजेन्टा चार्जग्रिडशी हातमिळवणी केली आहे. ही भागीदारी एथरला भारतातील अनेक मॅजेन्टा चार्जग्रिड स्थानांवर प्रवेश देईल. Magenta ChargeGrid सध्या भारतातील 35-40 शहरांमध्ये त्याचे चार्जिंग नेटवर्क विस्तारत आहे. ज्याचे लक्ष FY2023 च्या अखेरीस सुमारे 11,000 चार्जर्सचे नेटवर्क स्थापन करण्याचे आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI