Bajaj Pulsar N160 vs TVS Apache RTR 160 : सध्या देशात एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक्सना लोक पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विक्रीतही काही काळ तेजी दिसून येत आहे. म्हणूनच आज आम्ही बाजारात 160cc सेगमेंटमध्ये असलेल्या अशा दोन बाईक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांची या सेगमेंटमध्ये भरपूर विक्री आहे. बजाज पल्सर N160 आणि TVS Apache RTR 160 या बाईक्स आहेत. तुम्ही जर पॉवरफुल बाईक शोधत असाल, तर तुम्ही यापैकी एक निवडू शकता. यापैकी कोणती बाईक तुमच्यासाठी चांगली ते पाहा.
इंजिन कसे आहे?
पल्सर 164.8 cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जे 16 PS पॉवर आणि 14.65 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, TVS Apache RTR 160 मध्ये 159.7 cc सिंगल एअर कूल्ड आणि फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे. ही बाईक 16.04 PS पॉवर आणि 13.85 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.
फिचर्स कसे आहेत?
बजाज पल्सर N160 च्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. तसेच ड्युअल चॅनल अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम देखील उपलब्ध आहे. सस्पेन्शनसाठी याला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे.
TVS Apache ला दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनल ABS आहे. सस्पेंशनसाठी, याला मागील बाजूस 5 स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल रिअर गॅस चार्ज्ड शॉक ऍब्जॉर्बर आणि पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन सिस्टीम देण्यात आली आहे.
मायलेज किती?
Bajaj Pulsar N 160 48 kmpl मायलेज देते. दुसरीकडे, TVS Apache RTR एक लिटर पेट्रोल 50 kmpl पर्यंत धावू शकते.
किंमत किती असेल?
बजाज पल्सर एन 160 1.25 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीसह उपलब्ध आहे तर त्याचा टॉप व्हेरिएंट 1.28 लाख रुपयांना उपलब्ध आहे. TVS Apache RTR 160 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.18 लाख रुपये आणि टॉप मॉडेलसाठी 1.25 लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI