Airbag In Scooter: भारतात दरवर्षी लाखो लोक रस्ते आपला अपघातात जीव गमावतात. यासाठी वाहनांमधील सेफ्टी फीचर्स सातत्याने अपग्रेड केली जात आहेत. यासोबतच शासनाकडून नियमही कडक केले जात आहेत. अलीकडे सर्व कारमध्ये किमान 6 एअरबॅग्ज देण्याचा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. भारतात धावणाऱ्या काही मोजक्याच कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा आहेत. देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगचे फिचर्स आहेत. मात्र रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांपैकी बहुतांश दुचाकी चालक असतात आणि हे लक्षात घेऊन दुचाकी उत्पादक कंपनी दुचाकींच्या सुरक्षेसाठी लवकरच एअरबॅग असलेली आपली स्कूटर बाजारात आणणार आहे. या कंपनीने नुकतेच स्कूटरमधील या फीचर्सचा पेटंट घेण्यासाठी अर्ज केला आहे.


आपल्या स्कूटरमधील एअरबॅगसाठी प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटर्सने पेटंटसाठी अर्ज केला आहे. कंपनी देशाच्या ऑटोमोबाईल मार्केटमधील स्कूटर सेगमेंटमध्ये आपल्या Activa स्कूटरसह अव्वल स्थानावर आहे. हे पेटंट मिळाल्यानंतर होंडा आता कारमध्ये आढळणारे एअरबॅग फीचर आपल्या स्कूटरमध्येही देणार आहे. स्कूटर या फीचरने कशी सुसज्ज होणार आहे, हे जाणून घेऊ.


स्कूटरमध्ये एअरबॅग कशी फिट होणार 


स्कूटरमधील एअर बॅग हँडलच्या मध्यभागी ठेवली जाईल, जी स्कूटरच्या पुढील बाजूस बसवलेल्या एक्सेलेरोमीटरला जोडली जाईल. सध्याच्या कारमध्ये बसवलेल्या सिस्टीमपेक्षा हे वेगळे असेल. मात्र ही यंत्रणा कारमध्ये आढळणाऱ्या प्रणालीप्रमाणे काम करेल. कंपनी अनेक दिवसांपासून या प्रणालीची तयारी करत आहे.


एअरबॅग असणारी ही स्कूटर कधी होणार लॉन्च? 


Honda Motors ने 2009 मध्ये थायलंड आणि जपानमधून Honda PCX ही स्कूटर लॉन्च केली. आता ही स्कूटर कंपनी 2023 मध्ये भारतात लॉन्च करू शकते. एअरबॅग असलेली ही स्कूटर आणण्यासाठी कंपनीने पेटंटसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर पीसीएक्सला एअरबॅग फीचरने सुसज्ज करून लॉन्च केले जाईल, अशी अपेक्षा आहे. भारतातील दुचाकीमध्ये असे फीचर आणणारी ही पहिली कंपनी असेल.


दरम्यान, होंडाच्या बाईक आणि स्कूटर्सना भारतीय बाजारपेठेत खूप पसंती मिळत आहे. हेच कारण आहे की, गेल्या महिन्यात सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने विक्रीत वाढ नोंदवली आहे. Honda ने भारतामध्ये 21,746 युनिट्सच्या वाढीसह 4,23,226 युनिट्सची विक्री केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Mukesh Ambani Car Collection: अंबानींची दिवाळी शॉपिंग; खरेदी केल्या दोन नवीन रोल्स रॉयस, जाणून घ्या किती आहे किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI