Mukesh Ambani Car Collection: देशातील प्रसिद्ध उद्द्योगपती मुकेश अंबानी हे इतर गोष्टींप्रमाणे आपल्या कार कलेक्शनसाठीही प्रसिद्ध आहेत. दिवाळीनिमित्त अंबानी कुटुंबाने त्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी दोन रोल्स रॉयसेस कार खरेदी केल्या आहेत. ज्यापैकी एक कार अहमदाबाद आणि दुसरी मुंबईत ठेवण्यात आली आहे.  हे रोल्स रॉयसचे फॅंटम मॉडेल आहे. ज्यापैकी एक मॉडेल अहमदाबादमध्ये स्पॉट केले गेले आहे.  


cartoq ने दिलेल्या माहितीनुसार, अंबानींनी खरेदी केलेली रोल्स रॉयसचे हे मॉडेल ड्युअल टोन रंगांमध्ये आहे. ज्यात जुबली सिल्व्हर आणि बोहेमियन रेड यांचा समावेश आहे. अंबानी कुटुंबाकडे मुंबईत आधीपासूनच रोल्स रॉयस फॅंटम ईडब्ल्यूबी आहे. नवीन जनरेशन Rolls Royce Phantom नवीन अॅल्युमिनियम स्पेकफ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. जे जुन्या मॉडेलपेक्षा 30% हलके आहे. हे जुन्या मॉडेलपेक्षा 77 मिमी लहान, 8 मिमी लांब आणि 29 मिमी रुंद आहे. यात 24-स्लॅट ग्रिल, एलईडी डीआरएलसह नवीन एलईडी प्रोजेक्ट हेडलाइट आहे. याची डिझाइन यॉटपासून प्रेरित आहे.


कारमध्ये 6.75-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन आहे. जे 1700 rpm वर 563 bhp पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने फँटम VIII चे हे इंजिन 8-स्पीड सॅटेलाइट-एडेड ट्रान्समिशनने सुसज्ज केले आहे. ही लक्झरी कार फक्त 5.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडते. या कारचा टॉप स्पीड 250 किमी/तास आहे. आकाराच्या बाबतीत Rolls-Royce Phantom Standard Model VIII हे 5,762 मिमी लांब, 2,018 मिमी रुंद, 1,646 मिमी उंच आणि 3,552 मिमीचा व्हीलबेस आहे. ही कार अजूनही जगातील सर्वात कमी आवाज असलेली लक्झरी कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. 






जुलैमध्ये अंबानी कुटुंबाने त्यांच्या कार कलेक्शनमध्ये Bentley Bentayga चा समावेश केला आहे. हे 2021 मॉडेल आहे, जे 2020 मध्ये ब्रिटिश कार निर्मात्याने सादर केले होते. अंबानी कुटुंबात आधीपासून रेसिंग ग्रीन आणि ब्राउन बेंटगा आहे. नवीन मॉडेल पांढऱ्या रंगात खरेदी करण्यात आले आहे. 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI