Nissan Juke Hybrid Review: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी निसानने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन कार प्रदर्शित केली आहे. आज आपण कंपनीची नवीन कार Juke बद्दल आपण माहिती जाणून घेऊणार आहोत. कंपनीची नवीन कार Juke आपल्या डिजाइन आणि स्पोर्टीनेससाठी खासकरून युरोपियन बाजारपेठांमध्ये लोकप्रिय एसयूव्ही आहे. ही कार भारतात कधी लॉन्च होणार, याबाबत कंपनी अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. ही एसयूव्ही स्ट्रॉंग हायब्रीडसह येणार असा, दावा करण्यात आला आहे. निसानच्या या कारमध्ये काय असेल खास, यामध्ये कुठले फीचर ग्राहकांना मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
लूक
आम्हाला याचा लूक आणि स्टाईल खूप आवडलं आहे. कारण ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ही कार जवळजवळ कूप डिझाइन सारखी असून याला मस्क्यूलर लूक मिळतो. तर फ्लोटिंग रूफ स्टाइलिंग छान दिसते. गोलाकार हेडलॅम्पसह शार्प कट दिसते, तर याची ग्रिल खूपच आकर्षक आहे. स्पोर्टी लुकसोबतच नवीन जनरेशन Juke चे इंटिरिअर्सही खूप आलिशान आणि प्रीमियम आहे. याचे केबिन लेआउटही पूर्णपणे नवीन डिझाइन पाहायला मिळते. तर या नवीन एसयूव्हीमध्ये अधिक बूट स्पेस ग्राहकांना मिळणार आहे. असं असलं तरी यामध्ये फक्त चार माणसेच बसू शकतात. कारण कंपनीची ही कार फॉर सीटर आहे.
भारतीय बाजारपेठेत हायब्रीड तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेता ज्यूक हायब्रिड भारतासाठी चांगली एसयूव्ही ठरू शकते. हायब्रीड ज्यूक रेनॉल्ट/निसान सिस्टीमद्वारे समर्थित आहे. ज्यामध्ये 1.6L इंजिन 94hp पॉवर, 36kW (49hp) आणि 205Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. तर रेनॉल्टचे 15kW हाय व्होल्टेज स्टार्टर/जनरेटर प्लस इनव्हर्टर आणि Givesh1 पॉवर देतो. ही कार EV मोडमध्येही 80 टक्क्यांपर्यंत धावू शकते. ज्यामुळे मायलेज 40% पर्यंत वाढते. यात सॉफ्ट टच मटेरियल, Alcantara सह स्पोर्टी सीट्स आणि 8-इंच टचस्क्रीन, अॅपद्वारे रिमोट कमांड, हेडरेस्टमध्ये स्पीकरसह आठ स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम आणि इतर अनेक फीचर्स यात देण्यात आली आहेत.
भारत कधी होणार लॉन्च?
कंपनीने ही कार भारतात लॉन्च केल्यास, याला आयात करण्यात येणार. जशी हायब्रीड ग्रँड विटारा केली जाते. ज्यामुळे याची किंमत कधी असू शकते. ही कार डिझाइन आणि इंटिरिअर्सच्या बाबतीत अधिक ग्राहकांना आकर्षित करेल. दरम्यान, भारतात कंपनीने अलीकडेच आपली Nissan Magnite Red Edition लॉन्च केली होती. कंपनीने ही कार तीन प्रकारात लॉन्च केली असून लाला रंगात ही कार खूपच जबरदस्त वाटते. कंपनीने भारतात ही कार 7.87 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली होती.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI