Next Generation Maruti Suzuki Alto 800 : मारुती अल्टो 800 ही भारतातील सर्वात परवडणारी कार मानली जाते. ही सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. आता लवकरच ही कार नवीन अवतार दिसणार आहे. कंपनी याचा अपडेटेड व्हर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यासोबतच कंपनी कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देखील देऊ शकते. ही कार फक्त 5 सीटर असेल. कंपनीने याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी, 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत ही कार लॉन्च केली जाईल, असे मानले जात आहे. बाजारात याची स्पर्धा Renault Kwid सारख्या कारशी होईल. ही कार लॉन्च होण्याआधीच याच्या काही फीचर्सची माहिती समोर साली आहे.



  • नेक्स्ट जनरेशन अल्टोमध्ये 796cc, 3-सिलेंडर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 48PS ची पॉवर आणि 69Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह दिले जाऊ शकते. 

  • नवीन मारुती सुझुकी अल्टो 800 लाइटवेट हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. याचा लूक S-Presso सारखाच असू शकतो. ही कार क्रॉसओवर शैलीची असू शकते. ऑन रोड चाचण्यांदरम्यान बऱ्याच वेळा या कराल पाहण्यात आलं आहे. 

  • ही कार किफायतशीर असणार आहे. यात ग्राहकांना SmartPlay इन्फोटेनमेंट सिस्टम टॉप एंड व्हेरियंटमध्ये दिले जाऊ शकते. जे CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.

  • या कारमध्ये पॉवर विंडो, एलईडी डीआरएल व्हील कॅप्स, ड्युअल एअरबॅग आणि एबीएससह ईबीडी आणि रिव्हर्स पार्किंग सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

  • या वर्षाच्या अखेरीस ही कार भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. असे असले तरी अद्याप कंपनीने याच्या लॉन्चबद्दल अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.


संबंधित बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI