New Range Rover 2022 : लँड रोव्हर इंडियाने (Land Rover India) भारतात नवीन जनरेशनची लक्झरी रेंज रोव्हर एसयूव्ही (Range Rover SUV) लॉन्च केली आहे. या नवीन लक्झरीची भारतात डिलिव्हरीसुद्धा सुरु झाली आहे. Range Rover ही बहुप्रतिक्षीत लक्झरी कारपैकी एक आहे. नवीन जनरेशनचे मॉडेल असणाऱ्या SUV चे डिझाईन, इंजिन आणि किंमत जाणून घ्या. 


New Range Rover चे मॉडेल : 


Range Rover ही SUV बहुप्रतिक्षीत कारपैकी एक आहे. हे नवीन पिढीचे मॉडेल आहे जे एमएलए-फ्लेक्स बॉडी आर्किटेक्चरवर आधारित आहे. Range Rover चा इंटर्नल आणि एक्सटर्नल भागसुद्धा ग्राहकांना आकर्षित करणारा आहे. ड्रायव्हिंगचा एक उत्तम अनुभव देणारी ही लक्झरी आहे. 


Range Rover चे इंजिन : 


Range Rover मध्ये तीन पॉवरट्रेन 3.0 l डिझेल, 3.0 l पेट्रोल आणि 4.4 l पेट्रोल असलेल्या इंजिनसह देखील एक मोठा पर्याय आहे. पाचवी जनरेशन असलेल्या रेंज रोव्हरला कापड आणि लोकरीच्या मिश्रित वस्तूंव्यतिरिक्त विविध अपहोल्स्ट्री पर्यायांसह सर्व नवीन डिझाइन आणि नवीन इंटीरियर मिळते. कारच्या आतील भागात नवीन 13.1-इंच वक्र, लेयर स्क्रीन आणि नवीन 13.7-इंच इंटरएक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले आहे. इतर काही हायलाइट्समध्ये पॉवर असिस्ट दरवाजे, 35 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, रिअर एक्सल स्टीयरिंग, टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टम आणि स्वतंत्र एअर सस्पेंशन यांचा समावेश आहे. 


Range Rover ची किंमत : 


Range Rover ची किंमत 2.38 कोटी रुपयांपासून सुरू होते. तर, LWD ऑटोबायोग्राफी मॉडेल्ससह पहिल्या जनरेशनचे मॉडेल सुमारे 3.3 कोटी रुपये आहे. नवीन रेंज रोव्हर ही सुपर लक्झरी स्पेसमधील सर्वात लोकप्रिय SUV पैकी एक आहे आणि नवीन पिढीने तिला रोल्स-रॉईस आणि बेंटलीला टक्कर देण्यासाठी लक्झरी कारच्या दिशेने पुढे ढकलले आहे. Range Rover च्या डिझाईनमध्ये एक आकर्षक नवीन थीम आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI