Mercedes-Benz EQB Review : जर्मनीची वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंन्झ (Mercedes-Benz EQB) आपल्या लक्झरी वाहनांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. Mercedes' EQB इलेक्ट्रिक SUV मध्ये 7 सीटर कॉम्पॅक्ट लक्झरी SUV बरोबरच इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सध्या बाजारात या कारसाठी कोणतीही स्पर्धा नाही कारण या किमतीत 7 सीटरसह क्षमतेसह इतर कोणतीही इलेक्ट्रिक एसयूव्ही उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारात आधीच उपलब्द असलेल्या EQC पेक्षा EQB हा एक चांगला पर्याय असू शकतो. 


EQB ही लक्झरी ईव्ही सेगमेंटमधील पहिली सेव्हन-सीटर एसयूव्ही असेल. EQB चा लूक अधिक बॉसी आहे. जो EQC च्या अगदी विरुद्ध आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. मात्र, या कारचा हेडरूफ अधिक छान दिसतो. यासोबतच कारची एलईडी स्ट्रिपही खूप चांगली दिसते. या कारचा रोझ गोल्ड कलर हे मुख्य आकर्षण आहे. 




कारच्या इंटीरियरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, खास मर्सिडीज लूक दिलेला आहे. रोझ गोल्ड व्हेंट्स सारख्या काही वैशिष्ट्यांमुळे ही कार अधिक आकर्षित करते आणि अधिक ग्लॅमरस दिसते. यात ड्युअल 10.25-इंच स्क्रीन आहेत, तसेच EQS च्या विपरीत अनेक फिजिकल बटणे आहेत. शिवाय यामध्ये मोठी टचस्क्रीन आहे. मर्सिडीज इतर ब्रँडच्या तुलनेत उत्तम लाईटनिंगसाठी ओळखली जाते. 




यात पॉवर सीट्स, ट्विन सनरूफ, कनेक्टेड कार टेक असलेली MBUX सिस्टीम, 10-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ब्लाइंड-स्पॉट असिस्ट, पार्क असिस्ट यांसारखी इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही असूनही, EQB आतून खूपच लक्झेरियस आहे आणि मर्सिडीजने 7 सीटरसाठी एड्जस्टमेंट देखील केलेली आहे. दुस-या आणि तिसर्‍या रांगेतील सीट देखील चांगली जागा आणि योग्य हेडरूम देतात. तीन जण आरामात बसू शकतील असा फील कारमध्ये बसल्यावर येतो. 




EQB ड्रायव्हिंगच्या दृष्टीने उत्तम आहे, यात ट्विन मोटर लेआउटसह 66.5kWh बॅटरी पॅक मिळतो. हे एकूण 225bhp ची पॉवर आणि 390 Nm टॉर्क जनरेट करते आणि ही कार फक्त 8 सेकंदात 0-100 किमी/ताचा वेग गाठते. हे चालवणे इतके सोपे आहे की तुम्ही त्याचा टॉप स्पीड सहज मिळवू शकता. माफक टॉप-स्पीडपर्यंत पोहोचू शकते. EV चा स्पीड फार फास्ट आहे. परंतु EQB मध्ये, आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासह कोणताही धोका नाही. 




EQB ही एक जड SUV आहे पण ही कार गर्दीतही चालवायला हलकी आणि कॉम्पॅक्ट वाटते. सस्पेंशन उत्कृष्ट आहे, जे फॅमिली एसयूव्हीसाठी उत्तम आहे. त्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे EV असूनही, ही एक SUV आहे जी तुम्ही रोड ट्रिपवर जाऊ शकता. त्याचा ग्राउंड क्लीयरन्स EQC पेक्षा खूप चांगला आहे. 




EQB 300 ही भारतासाठी उत्तम ग्राउंड क्लीयरन्स, चांगली रेंज, कॉम्पॅक्ट आकार तसेच आकर्षक ड्रायव्हिंग अनुभव आणि प्रशस्त केबिनसह परिपूर्ण EV लक्झरी SUV आहे. लक्झरी SUV म्हणून, EQB ही EV चा एक चांगला पर्याय आहे. एकूणच कारची गुणवत्ता, डिझाइन, जागा, परफॉर्मन्स, ग्राउंड क्लीयरन्स, 7 सीटर कार सर्व चांगले आहे. मात्र, रेंज अधिक चांगली असू शकली असती.


महत्त्वाच्या बातम्या : 


Tata Blackbird : टाटा घेऊन येत आहे 'ब्लॅकबर्ड' नावाची आणखी एक जबरदस्त कार, ह्युंदाईच्या क्रेटाला देणार टक्कर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI