Maruti Brezza : Maruti Suzuki लवकरच ब्रेझाची नवीन सिरीज लॉन्च करणार आहे. येत्या काही दिवसांत, मारुती सुझुकीची ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार अधिक चांगल्या लूक आणि वैशिष्ट्यांसह लॉन्च होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी, नवीन ब्रेझ्झाची अनेक नवीन वैशिष्ट्ये समोर आली आहेत, ज्यात फॅक्टरी फिटेड सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि ड्युअल टोन कलर अलॉय व्हील यांचा ब्रेझाच्या सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असतील. जाणून घेऊया खास वैशिष्ट्ये, लॉंच कधी होणार आणि इतर माहिती
सनरूफ असलेली मारुतीची पहिली कार 'Brezza'!
मारुती पुढील महिन्यात नवीन Brezza लाँच करणार आहे आणि अनेक खास बदलांसह ती सर्वात नवीन कार असेल. या कारमध्ये मजबूत स्टील वापरण्याबरोबरच याची गुणवत्ता अधिक कठोर केली आहे. नवीन ब्रेझ्झाला किंचित बॉक्सी लुक कायम ठेवत नवीन डिझाइनची ओळख मिळेल. मारुतीच्या नवीन ब्रेझा कारला सनरूफ करण्यात आले आहे. जे टॉप-एंड मॉडेलवर असेल. या कारमध्ये 6 एअरबॅग देखील पाहू शकता आणि 5-स्टार GNCAP रेटिंग देखील लवकरच येऊ शकेल. या कारची डिझेल आवृत्ती नसेल कारण त्याऐवजी नवीन ब्रेझामध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह ड्युअलजेट 1.5L पेट्रोल इंजिन मिळेल जे मायलेज वाढवेल
इंजिन-पॉवर आणि वैशिष्ट्ये
आगामी 2022 मारुती ब्रेझ्झाची अपेक्षित वैशिष्ट्ये फॅक्टरी फिटेड सनरूफ, वायरलेस चार्जिंग सिस्टम, नवीन फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच ई-सिम कनेक्टिव्हिटी आणि जिओ फेन्सिंग, रिअल टाईम ट्रॅकिंग, फाइंड माय कारसह कनेक्ट केलेली कार वैशिष्ट्ये असू शकतात. नवीन ब्रेझामध्ये अनेक एअरबॅगसह इतर सुरक्षा वैशिष्ट्ये देखील मिळतील. त्याची किंमत 7.5 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. 2022 मारुती सुझुकी विटारा ब्रेझाच्या इंजिन-पॉवर आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर, सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 1.5 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल, जे 105 hp पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करेल. Brezza चे सध्याचे मॉडेल मॅन्युअल तसेच 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे तसेच जनरल ब्रेझामध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिसू शकतो.
आधुनिक लूक
मारुती सुझुकीच्या नवीन विटारा ब्रेझाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे बंपर आणि हेडलाइट डिझाइन, नवीन क्लॅमशेल स्टाइल आणि नवीन फ्रंट फेंडर्ससह पूर्णपणे बदलला आहे. नवीन एसयूव्ही सध्याच्या मॉडेलच्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे आणि त्याचे बॉडीशेलसह दरवाजे पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. मागील बाजूस पाहता, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागील दरवाजामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच त्याची नंबर प्लेट देखील खालच्या बाजूस हलवण्यात आली आहे. ब्रेझाला नवीन रॅपराउंड टेललाइट्स, तसेच नव्याने डिझाइन केलेले बंपर लावण्यात आले आहेत. या कारला ड्युअल टोन अलॉय व्हील्स, कारच्या समोर आणि मागील बाजूस सेन्सर्स दिले आहेत, तसेच ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत असेल. आता लॉन्च होण्याआधीच या कारचे पार्ट्स दिल्लीच्या करोल बाग मार्केटमध्ये विकायला सुरुवात झाली आहे, अलीकडेच या कारच्या हेडलाइट्सची विक्री या मार्केटमध्ये होताना दिसली आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI