New Kia Seltos GTX+ DCT Review : यापूर्वी आपण iMT क्लचलेस मॅन्युअलसह HTX+ ची टेस्टिंग केली होती. परंतु, ही टॉप-स्पेक GT लाईन आहे आणि पॅडल शिफ्टर्ससह 7-स्पीड DCT ऑटोमॅटिकसह अपडेटेड वैशिष्ट्यांसह येते. GT व्हेरिएंट देखील वेगळा आहे. 18-इंच अलॉय व्हील आणि मागील बाजूस ड्युअल एक्झॉस्ट तसेच रिडिझाइन केलेला बंपर मिळतो.
New Kia Seltos GTX+ DCT च्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास, ही पूर्ण ब्लॅक कलरमध्ये नाहीये तर GT व्हेरिएंट्सना व्हाईट इन्सर्ट मिळतात. DCT त्याच्या ड्राइव्ह मोडमध्ये देखील आहे, ज्यामुळे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पूर्णपणे रिडिझाइन केलेले दिसते. याशिवाय, 360 डिग्री कॅमेरा, पॉवर्ड हँडब्रेक आणि ADAS फीचर देखील टॉप-स्पेक सेल्टोसमध्ये उपलब्ध आहेत.
सर्वात आधी, ADAS बद्दल जाणून घेऊयात. यात ADAS लेव्हल 2 फीचर्ससह तीन रडार आणि पाच कॅमेरे आहेत. फीचर्सबद्दल सांगायचे तर, फ्रंट कोलिजन वॉर्निंग, फ्रंट कोलिजन असिस्ट-जंक्शन टर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन अव्हायडन्स असिस्ट, SCC आणि स्टॉप अँड गो सह स्मार्ट क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
ड्रायव्हिंगबद्दल बोलायचे झाल्यास, याला 7-स्पीड डीसीटीशी जोडलेले 1.5L टर्बो इंजिन मिळते, ज्यामुळे ती एक वेगवान SUV बनते. हे iMT पेक्षा वेगवान आहे आणि मागील DCT पेक्षा शिफ्टसह स्मूथ आहे. ही SUV खूप वेगवान असण्याव्यतिरिक्त, गिअरबॉक्स देखील जलद काम करते. रोजच्या वापरासाठीही गाडी चालवणे सोपे आहे, कारण त्यात स्मूथ आणि आरामदायी अनुभव मिळतो. पूर्वीच्या DCT 1.4L Turbo पेक्षा मायलेज जास्त आहे, परंतु तरीही ते तुम्ही कसे चालवता यावर अवलंबून आहे.
2023 Kia Seltos Facelift च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, 2023 kia SELTOS ला पूर्णपणे नवीन 1.5 लिटर T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 160 ps आणि 253 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह तुम्हाला 6-iMT आणि 7 DCT चा पर्याय मिळेल. नवीन इंजिनबरोबर तुम्हाला जुने पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील दिले जात आहे. 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आणि 1.5 लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन ज्यासह तुम्हाला अनेक ट्रान्समिशन देखील मिळतील. म्हणजेच, तीन इंजिन आणि 5 ट्रान्समिशन ज्यामध्ये MT, iMT, IVT, 6AT, आणि 7DCT चा पर्याय उपलब्ध असेल असे नवीन वैशिष्ट्य या कारमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI