New Range Rover Velar SUV : लँड रोव्हरने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन लक्झरी रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 93 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याबरोबरच कंपनीने या कारसाठी बुकिंगही सुरू केले आहे, ज्याची डिलिव्हरी सप्टेंबर 2023 मध्ये सुरू होईल.


New Range Rover Velar डिझाईन कशी आहे?


New Range Rover Velar च्या एक्सटर्नल लूकबद्दल बोलायचे झाल्यास, रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्टमध्ये सुधारित डीआरएलसह नवीन पिक्सेल एलईडी हेडलॅम्प सादर केले गेले आहेत. त्याच वेळी, त्याची साइड प्रोफाइल पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे, तर मागील बाजू देखील बदलण्यात आली आहे. ज्यामध्ये टेल लॅम्प आणि बंपर पुन्हा डिझाइन करण्यात आले आहेत.


नवीन रेंज रोव्हर वेलार इंटिरियर


New Range Rover Velar च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या डॅशबोर्डला रेंज रोव्हर वेलार स्पोर्ट आणि रेंज रोव्हर सारखे नवीन डॅशबोर्ड मिळाले आहे. ज्यामध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, Land Rover's Piwi Pro चालवणारी एकदम नवीन 11.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली आणि वायरलेस चार्जर यांचा समावेश आहे. याशिवाय त्याच्या सेंटर कन्सोलमध्ये आणखी काही बटणे जोडण्यात आली आहेत. रोटरी ड्राइव्ह सिलेक्टरची जागा नवीन पारंपारिक युनिट्सने घेतली आहे.


नवीन रेंज रोव्हर वेलर इंजिन कसे आहे?


कंपनीने ही नवीन लक्झरी कार एकच HSE प्रकार आणि दोन इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. म्हणजेच, नवीन वेलार 2.0l पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जे 250 hp कमाल पॉवर आणि 365 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, या SUV मध्ये सौम्य-हायब्रिड प्रणालीसह 2.0l डिझेल इंजिन देखील आहे, जे जास्तीत जास्त 204 hp आणि 430 NM पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. 


त्याच्या पेट्रोल व्हेरियंटचा टॉप स्पीड 217 किमी/तास आहे आणि 7.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. त्याच्या डिझेल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, याचा टॉप स्पीड 210 किमी/तास आहे आणि ते 8.3 सेकंदात 0-100 किमी प्रति तास करण्यास सक्षम आहे. त्याची वॉटर-वेडिंग क्षमता 580 मिमी पर्यंत आहे. तसेच, 'एलिगंट अरायव्हल' मोडसह एअर सस्पेंशन आहे, जे त्याची उंची 40 मिमीने कमी करण्यास सक्षम आहे.


या कारशी होणार स्पर्धा 


नवीन रेंज रोव्हर वेलार जॅग्वार एफ पेस आणि पोर्श मॅकन सारख्या लक्झरी वाहनांशी स्पर्धा करणार आहे.


New Range Rover Velar किंमत किती?


कंपनीने हे पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे, ज्याची किंमत एक्स-शोरूम 93 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI