New Hyundai Verna 2023 Safety Features: Hyundai आपली नवीन सेडान कार Hyundai Verna 21 मार्च रोजी लॉन्च करणार आहे. ही कार ADAS लेव्हल 2 फीचर्ससह येणारी आपल्या सेगमेंटमधील पहिली कार असेल. नवीन Hyundai Verna ADAS मध्ये Hyundai SmartSense फीचर्स असतील. ज्यात रडार (समोर आणि मागे), सेन्सर्स आणि मल्टीपल कॅमेरे (समोर) असतील. जे रस्त्यावरील अडथळे ओळखून त्यानुसार ड्रायव्हरला सतर्क करू शकतील किंवा स्वत:हून कार नियंत्रित करू शकतील. काय आहेत या कारचे खास फीचर्स, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
- फॉरवर्ड टक्कर चेतावणी
- फॉरवर्ड कोलिशन अवॉयडन्स असिस्ट - इतर वाहनांशी टक्कर टाळण्यासाठी
- फॉरवर्ड कोलिशन अवॉयडन्स असिस्ट - रस्त्यावर चालणाऱ्या लोकांशी टक्कर टाळण्यासाठी
- फॉरवर्ड कोलिशन अवॉयडन्स असिस्ट - सायकलची टक्कर टाळण्यासाठी
- फॉरवर्ड कोलिजन अवॉयडन्स असिस्ट - कॉर्नरिंग टक्कर टाळण्यासाठी
- ब्लाइंड स्पॉट टक्कर चेतावणी
- ब्लाइंड स्पॉट कोलिशन अवॉइडन्स असिस्ट
- लेन राखण्यासाठी मदत
- लेन एक्सिट वॉर्निंग
- ड्रायव्हिंग अटेंशन वॉर्निंग
- सुरक्षित एक्सिट वॉर्निंग
- स्टॉप अँड गो सह स्मार्ट क्रूझ नियंत्रण
- मागील क्रॉस ट्रॅफिक टक्कर चेतावणी
- मागील क्रॉस वाहतूक टक्कर टाळणे सहाय्य
New Hyundai Verna 2023 सेफ्टी फीचर्स
ADAS लेव्हल 2 कारचे अंशतः नियंत्रण करण्यास सक्षम असेल. तसेच याच्या पुढील आणि मागे दिलेले रडार बरेच अॅडव्हान्स आहेत. सध्या ADAS होंडा सिटीमध्ये उपलब्ध आहे, परंतु Hyundai Verna ADAS लेव्हल 2 सह येईल. ADAS सह येणारी Tucson आणि Ioniq 5 (प्रीमियम कार) नंतर Hyundai Verna ही तिसरी Hyundai कार असेल. याशिवाय नवीन Verna मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील उपलब्ध असतील. जसे की...
- 6 एअरबॅग्ज (ड्रायव्हर प्रवासी आणि बाजूला)
- VSM सह ESC (इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण).
- हिल स्टार्ट असिस्ट (एचएसी)
- ऑल डिस्क ब्रेक
- EPB (इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक)
- समोर पार्किंग सेन्सर
- ECM (इलेक्ट्रो क्रोमिक मिरर)
- कॉर्नरिंग लाईट
- टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (हायलाइन)
यामध्ये बोस ऑडिओ सिस्टीम आणि 10.25-इंच स्क्रीनसह व्हेंटिलेटेड सीट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स ही मिळणार आहे. असं असलं तरी अद्याप याच्या किंमतीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही आहे.
इतर महत्वाची बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI