Hop Electric Bike: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलपासून अनेक नवीन वाहन उत्पादक कंपन्या या क्षेत्रात नव्याने उतरल्या आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याला अनेक इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर लॉन्च होत आहे. यातच आता Hope Electric आपली नवीन बाईक लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. कंपनी आपली नवीन बाईक 5 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. या बाईकचे नाव Hop Oxo असे असेल. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक बाईकचे फीचर्स आणि किंमत.


Hop Oxo लूक 


कंपनीने काही दिवसांपूर्वीच या फ्लॅगशिप बाईकच्या संदर्भात एक टीझर जारी केला होता. त्यानुसार असे म्हणता येईल की, ही इलेक्ट्रिक बाईक ट्रेंडी व्हिझर, डीआरएल, स्पीयर शेप टर्न इंडिकेटर, एलईडी यांसारख्या ठळक दिसणार्‍या डिझाइनसह स्पोर्ट केली जाईल. अनेक फिचर्सने सुसज्ज ही बाईक बाजारात दाखल होणार आहे. ही बाईक सिंगल सीट ऑप्शनमध्ये येईल, ज्याचे मुख्य आकर्षण याची रेंज आहे. ही बाईक प्रति चार्ज 100-150 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. या बाईकचा कमाल वेग 80-90 किमी प्रतितास असू शकतो.


कंपनीने या बाईकची चाचणी देशातील 20 वेगवेगळ्या शहरांमध्ये 1 लाख किमी चालवून आधीच केली आहे. कंपनी ही बाईक देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या 140 टचपॉइंट्सवर विकू शकते. आतापर्यंत ही इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी फक्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये आपले मॉडेल ऑफर करत होती. आता कंपनी इलेक्ट्रिक बाईकच्या सेगमेंटमध्येही लॉन्च करण्यास तयार आहे.


इतकी झाली प्री-बुकिंग 


होप इलेक्ट्रिक कंपनीने गेल्या महिन्यातच या इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू केली आहे. या बाईकच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, बुकिंग सुरू झाल्यापासून काही तासांतच लोकांनी 5,000 हून अधिक युनिट्सचे बुकिंग केले आहे. अजूनही या बाईकची बुकिंग सुरू आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI