New Honda Activa 125 H-Smart: Honda Motorcycle and Scooter India ने आज नवीन Honda Activa 125 स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ज्याची प्रारंभिक किंमत 78,920 रुपये एक्स-शोरूम आहे आणि Honda Activa 125 H-Smart ची एक्स-शोरूम किंमत 88,093 रुपये आहे. देशांतर्गत बाजारात ही स्कूटर सुझुकी, टीव्हीएस, यामाहा आणि हिरोसारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. याच स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


New Honda Activa 125 H-Smart: लूक


कंपनीने आपली नवीन स्कूटर अंडरबोन फ्रेमवर तयार केली आहे, ज्यामध्ये इंडिकेटर-माउंटेड फ्रंट ऍप्रन, फ्लॅट-टाइप सीट, सिल्व्हर ग्रॅब रेल आणि अंडर-सीट स्टोरेज कंपार्टमेंट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, मिक्स मेटल फ्रंट अलॉय आहे. 12-इंच आणि मागील अलॉय व्हील 10-इंच दिले आहेत. स्कूटरचे वजन 111 किलो आहे आणि त्याची इंधन टाकीची क्षमता 5.3-L आहे.


New Honda Activa 125 H-Smart: इंजिन


Honda ची ही नवीन Activa स्कूटर BS-6 फेज-2 स्टँडर्डची आहे. ही स्कूटर 124cc एअर-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 6,500rpm वर 8.18hp ची कमाल पॉवर आणि 5,000rpm वर 10.3Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर CVT गिअरबॉक्सशी जोडली गेली आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी/तास आहे आणि याच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर 50-60 किमी/प्रतिलिटर  अंतर कापण्यास सक्षम आहे.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:


Hyundai Mufasa Compact SUV: Hyundai ने सादर केली नवीन SUV Mufasa, जबरदस्त फीचर्सने आहे सुसज्ज


New Honda Activa 125 H-Smart: फीचर्स 


या स्कूटरमध्ये उत्तम राइडिंग आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, कंपनीने समोरच्या चाकावर डिस्क ब्रेक आणि मागील चाकावर ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम (CBS) दिले आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाल्यास, याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस 3-स्टेप अॅडजस्टेबल स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक युनिट मिळते.


New Honda Activa 125 H-Smart: किंमत


कंपनीने Honda Activa देशांतर्गत बाजारात 78,920 रुपयांच्या किमतीत आणि याची टॉप स्मार्ट मॉडेल 88,093 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले आहे. या स्कूटरची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.


New Honda Activa 125 H-Smart: या स्कूटरशी होणार स्पर्धा 


Honda च्या नवीन Activa 125 शी स्पर्धा करणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Suzuki Access 125, TVS Jupiter 125, Yamaha Fascino 125 आणि Hero Destini सारख्या स्कूटरचा समावेश आहे.


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI