Hero Xoom: Hero MotoCorp लवकरच भारतीय बाजारात नवीन स्कूटर लॉन्च करणार आहे. नुकताच कंपनीने त्याचा टीझर रिलीज केला आहे. हिरोच्या नवीन स्कूटरचे नाव Hero Xoom असे असेल. एका रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, ही स्कूटर 110 सीसी इंजिनमध्ये लॉन्च केली जाईल आणि ती Honda Dio शी स्पर्धा करेल. हिरो 30 जानेवारीला ही स्कूटर लॉन्च करू शकते.


Hero Xoom च्या टीझरमध्ये स्कूटरच्या डिझाईनबद्दल अनेक तपशील समोर आले आहेत. या स्कूटरमध्ये कंपनीने स्पोर्टी फ्रंट फेंडर दिले आहे. स्कूटरमधील हेडलाईट फेंडरवरच बसवण्यात आले आहे. हे हेडलाइट युनिट LED मध्ये असू शकते. या स्कूटरमध्ये एलईडी टेल लाईट युनिट देखील दिले जाऊ शकते. स्कूटरच्या हँडलबारला टर्न इंडिकेटर लावले गेले आहेत, जे हॅलोजनमध्ये आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या स्कूटरमध्ये i3S स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान देऊ शकते. ज्यामुळे इंधनाची बचत होते. Hero Xoom ला पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि X-tec कनेक्टेड फीचर देखील दिले जाईल. यात कॉल आणि एसएमएस अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. असे बोलले जात आहे की, इतर स्कूटरप्रमाणे याला बाह्य इंधन कॅप मिळणार नाही.


Hero Xoom: मिळणार पॉवरफुल इंजिन 


कंपनी या स्कूटरमध्ये 110cc इंजिन देऊ शकते. जे Pleasure Plus आणि Maestro Edge 110 मध्ये वापरले जात आहे. हे इंजिन 8 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटरला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन दिले जाईल.


Hero Xoom चा टॉप व्हेरियंट अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेकमध्ये आणला जाऊ शकतो. तर ड्रम ब्रेक आणि स्टील व्हील खालच्या व्हेरियंटमध्ये दिले जातील. या स्कूटरमध्ये 12-इंचाचे अलॉय व्हील दिले जाऊ शकतात.  Hero Xoom ही Honda च्या स्पोर्टी स्कूटर Honda Dio शी टक्कर देऊ शकते, जी तरुण ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.


Activa एच-स्मार्ट लॉन्च 


सिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने Activa चे H-Smart व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने या स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 74,536 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह कंपनीच्या सध्याच्या Activa 6G चे अपडेटेड मॉडेल आहे.   कंपनीने Activa H-Smart मध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. यात 110cc PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. OBD2 सह या इंजिनमध्ये एन्हांस्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान देखील जोडण्यात आले आहे. यासोबतच अपडेटेड प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन, नवीन स्मार्ट टम्बल टेक्नॉलॉजी, एसीजी स्टार्टर आणि फ्रिक्शन रिडक्शन टेक्नॉलॉजी यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI