New Generation Swift 2023 Features : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) युरोपमध्ये नेक्स्ट जेन सुझुकी स्विफ्टची (Swift) टेस्टिंग सुरू केली आहे. मारुती या हॅचबॅकचे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारात लॉन्च करू शकते. ही कार भारतात 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. ही कार हायब्रिड पॉवरट्रेनसह येईल. तसेच उत्तम डिझाइन आणि आलिशान इंटीरियरसह ही कार तयार करण्यात आली आहे. नवीन स्विफ्टमध्ये काय खास आहे ते पाहूया.


नवीन आणि हलका प्लॅटफॉर्म
सुझुकी मारुती स्विफ्टचा नवा अवतार त्यांच्या लाइटवेट हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करू शकते. या प्लॅटफॉर्ममध्ये अल्ट्रा आणि अॅडव्हान्स हाय स्ट्रेंथ स्टील्सचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये कारचे मायलेज सुधारण्यासोबतच उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभवही घेता येतो.


हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज 
2023 मारुती स्विफ्टमध्ये 1.2-लिटर K12N DualJet पेट्रोल इंजिन सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने दिले जाऊ शकते. हे गॅसोलीन युनिट 89bhp ची कमाल पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय मिळू शकतात.


सीएनजी किटही मिळेल
नव्या पिढीतील स्विफ्टमध्ये सीएनजी किटचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. ही कार 1.2L DualJet पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह बाजारात आणली जाऊ शकते.


कशी असेल कार?
नवीन मारुती स्विफ्ट 2023 मधील बहुतेक कॉस्मेटिक बदल पुढील बाजूस केले जातील. नवीन एलईडी स्लीक हेडलॅम्प्स, सर्व नवीन फ्रंट ग्रिल, फॉग लॅम्प असेंब्लीमध्ये नवीन सी आकाराचे एअर स्प्लिटर यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये पाहायला मिळतात. यासोबतच या कारमध्ये नवीन डिझाईनचे ड्युअल टोन अलॉय व्हील, ब्लॅक-आउट पिलर, रूफ माऊंटेड स्पॉयलर, नवीन बॉडी पॅनल्स देखील देण्यात येणार आहेत.


ही वैशिष्ट्ये नवीन असतील
नवीन मारुती स्विफ्टमध्ये अद्ययावत इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड आणि नवीन अपहोल्स्ट्री यासह अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक


 


 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI