Hyundai Verna Launch: Hyundai Motor India आपली नवीन जनरेशन Verna sedan उद्या म्हणजेच 21 मार्च रोजी देशात लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी या कारचे अनेक फोटो समोर आले आहेत. काही काळापूर्वी या कारच्या इंटीरियरची माहितीही लीक झाली होती. ज्यामध्ये या कारशी संबंधित काही खास माहिती समोर आली होती. या कारमध्ये कंपनी अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. तसेच ही कार दिसायलाही खूप आकर्षक असणार आहे. कंपनी आपल्या या अपकमिंग कारमध्ये काय देऊ शकते खास, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
Hyundai Verna Launch: मिळू शकतात आहे फीचर्स
नवीन जनरेशन Verna मध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप असेल, ज्यामध्ये 10.25-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट असेल. एवढा मोठा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट युनिट मध्यम आकाराच्या सेडानमध्ये प्रथमच दिसणार आहे. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतील. यासोबतच यामध्ये Advanced Driver Assistance Systems (ADAS) देखील उपलब्ध असणार आहे. ज्यात ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश असेल. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, VSM, ट्रॅक्शन कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम उपलब्ध असेल.
Hyundai Verna Launch: पॉवरट्रेन
नवीन Verna मध्ये विद्यमान 1.5-लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल. जे 115 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच नवीन 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय असेल. जो 160 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करू शकतो. यामध्ये स्टँडर्ड म्हणून 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पर्यायी म्हणून मिळेल.
Hyundai Verna Launch: या करशी होणार स्पर्धा
ही कार स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन व्हरटस, मारुती सुझुकी सियाझ आणि फेसलिफ्टेड होंडा सिटी सारख्या कारशी स्पर्धा करेल. होंडाने अलीकडेच आपल्या सिटी सेडानचा फेसलिफ्ट व्हराजन लॉन्च केला आहे. नवीन Honda City Facelift SV, V, VX आणि ZX अशा 4 ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या एसव्ही ट्रिमशिवाय इतर सर्व ट्रिममध्ये ADAS फीचर देण्यात आले आहे. याचे V, VX आणि ZX ट्रिम्स मॅन्युअल आणि CVT पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन त्याच्या V ट्रिममध्ये देखील उपलब्ध आहे. यात 1.5L 4-सिलेंडर NA पेट्रोल आणि 1.5L NA पेट्रोल इंजिनचे दोन पर्याय आहेत. यासोबतच यात मजबूत हायब्रीड तंत्रज्ञानही देण्यात आले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI