2023 Suzuki Gixxer launched: सुझुकी मोटरसायकलने भारतात आपली Gixxer बाईक रेंज अपडेट केली आहे. नवीन Suzuki Gixxer रेंज 9 नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यापैकी 3 आता मॅट पेंट स्कीममध्ये आहेत. नवीन Suzuki Gixxer बाईक रेंजची किंमत 1.40 लाख ते 2.02 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत.

याच बाइकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


2023 Suzuki Gixxer launched: स्मार्टफोनशी कनेक्ट करता येईल बाईक 


कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त, नवीन Gixxer बाईक्सला फीचर अपडेट्स देखील देण्यात आले आहेत. कंपनीने Gixxer 155, Gixxer 155 SF, Gixxer 250 आणि Gixxer 250 SF बाईक्समध्ये Suzuki Ride Connect फीचर दिले आहे. नवीन बाईक आता ब्लूटूथ सक्षम डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह येतात. ज्या स्मार्टफोनशी कनेक्ट केल्या जाऊ शकतात. बाईकच्या डिस्प्लेवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल, एसएमएस अलर्ट, व्हॉट्सअॅप मेसेज आणि मिस्ड कॉल अलर्टशी संबंधित माहिती उपलब्ध असेल. याशिवाय बाईकच्या डिस्प्लेवर स्पीड अलर्ट, फ्युएल लेव्हल, स्मार्टफोनची बॅटरी लेव्हल आणि अरायव्हल टाईमची माहितीही मिळणार आहे. बाईकचा इन्स्ट्रुमेंट कन्सोल अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीला सपोर्ट करतो.


2023 Suzuki Gixxer launched: इंजिन 


सुझुकी मोटरसायकलने 2020 मध्ये Gixxer बाईक शेवटची अपडेट केली होती. त्यावेळी या बाईक्स नवीन रंग आणि ग्राफिक्समध्ये आणल्या होत्या. या बाईक्सच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सुझुकी Gixxer 155 आणि Gixxer SF 155 मध्ये हेच 155cc फ्युएल-इंजेक्टेड इंजिन दिले जात आहे. हे इंजिन 13.41 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क देते. Gixxer 250 आणि Gixxer 250 SF बद्दल बोलायचे झाल्यास, या बाईक्समध्ये 249cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 26.13 Bhp पॉवर आणि 22.2 Nm टॉर्क जनरेट करते. दोन्ही बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आहे.


Yamaha GT 150 Fazer 


जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने (Yamaha ) अलीकडेच आपली GT150 Fazer बाईक लॉन्च केली होती. यासोबतच कंपनीने चीनच्या बाजारपेठेत आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. बाईकची स्टाईल आणि लूक एकदम क्लासिक आहे. कंपनीने स्थानिक बाजारात या बाईकची प्रारंभिक किंमत 13,390 युआन इतकी आहे. याची किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 1.60 लाख रुपये इतकी आहे. या बाईकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकचा लूकही दमदार आहे. या बाईकमध्ये 150cc इंजिन वापरण्यात आले आहे. या बाईकचा लूक थोडा स्पोर्टी आहे. या बाईकमध्ये अलॉय व्हील्स, एक्झॉस्ट इंजिन, सिग्नेचर रेट्रो बिट्समध्ये गोल हेडलॅम्प, रिअर व्ह्यू मिरर, फोर्क गेटर्स, फेंडर्ससह फ्रंट आणि रिअर सस्पेन्शन देण्यात आले आहेत. 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI