Mumbai Double Decker Electric Bus: आता मुंबईतील नागरिकांच्या प्रवासाचा आनंद दुप्पट होणार आहे. उद्या बेस्टच्या ताफ्यात नवीन 'डबल डेकर इलेक्ट्रिक बस' दाखल होणार आहे. याबाबत मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे. ही भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल. 18 ऑगस्ट रोजी उद्घाटन कार्यक्रमापूर्वी ही बस नुकतीच रस्त्यावर दिसली आहे. या बसची सेवा सामान्य नागरिकांसाठी सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन बसचे उद्घाटन होणार आहे.


या बसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये हायवेवर इलेक्ट्रिक डबल डेकर बस दिसत आहे. यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊन इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्यास सज्ज असल्याचं सांगण्यात आलं होत. बेस्टकडे सध्या 400 हून अधिक सिंगल-डेकर इलेक्ट्रिक बसेस आहेत. याशिवाय टप्प्याटप्प्याने 900 इलेक्ट्रिक बसेसची मागणीही त्यांनी केली आहे. त्यापैकी 50 टक्के पुरवठा मार्च 2023 पर्यंत केला जाणार आहे.


रस्त्यावर दिसलेली ही बस दिसायला छान आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. ही नवीन बस पाहताच तुम्हाला लंडनमधील डबल डेकर बसची आठवण येईल. व्हिडीओत दिसणारी बस भारतीय व्यावसायिक वाहन निर्माता अशोक लेलँड यूकेची उपकंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीने बनवली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे मॉडेल कदाचित त्यांच्या मेट्रोडेकर डबल-डेकर इलेक्ट्रिक बसची सुधारित व्हर्जन आहे. बस डिझाइन आणि जागेच्या दृष्टीने छान दिसते.


 


 






दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये अशा नवीन बसेस समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. मुंबईत दररोज 31 लाख प्रवासी बसने प्रवास करतात. येत्या एक ते दोन वर्षांत प्रवाशांच्या संख्येत आणखी 1 ते 2 लाखांनी वाढ होऊ शकते. सरकारने यापूर्वीच 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसना मान्यता दिली आहे. ज्यामध्ये या वर्षअखेरीस 225 बसेस धावताना दिसू शकतात. तसेच पुढील 225 बसेस मार्च 2023 मध्ये आणि उर्वरित 450 बसेस जून 2023 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल.


संबंधित बातमी:


Double Decker Electric Bus: खुशखबर! मुंबईत लवकरच धावणार 'डबल डेकर इलेक्ट्रिक बस'


Car loan Information:

Calculate Car Loan EMI