Kawasaki Ninja 400 Launched in India : सुमारे अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कावासाकीने पुन्हा एकदा आपली बाईक Ninja 400 भारतात लॉन्च केली आहे. कावासाकीने काही दिवसांपूर्वी निन्जा 400 जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली होती. आता ही बाईक भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध झाली आहे. Kawasaki ने याची प्रारंभिक किंमत 4.99 लाख रूपये इतकी ठेवली आहे. कंपनीच्या नवीन 2022 मॉडेलमध्ये बरेच बदल देखील करण्यात आले आहेत, ज्यामुळे ही बाईक आणखी स्टायलिश आणि पॉवरफुल दिसते.


कंपनीचे म्हणणे आहे की, कावासाकी निन्जा 400 चे बुकिंग सुरु झाले आहे. लवकरच याची डिलिव्हरी भारतातही सुरू होईल. कंपनीने पुढे सांगितले की, आता कावासाकी निन्जा 400 चे मॉडेल पूर्वीच्या तुलनेत अपग्रेड करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, बाईक खूप अपडेट करण्यात आली आहे. भारतात पहिल्यांदा  ही बाईक एप्रिल 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. ती बाईक BS6 उत्सर्जन नियमांनुसार नव्हती.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलच्या तुलनेत खूप अपडेट करण्यात आले आहे. यामुळे ही बाईक आणखी आकर्षक आणि छान दिसते. बाईकला पॉवर देण्यासाठी यात 399 सीसी, लिक्विड-कूल्ड, समांतर ट्विन मोटर इंजिन आहे. हे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच ड्युअल चॅनल एबीएससह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. असं बोलले जात आहे की, कावासाकी निन्जा 400 ची भारतीय बाजारपेठेत कोणाशीही स्पर्धा नाही. मात्र तरीही याला KTM RC 390 टक्कर देऊ शकते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI