MG Motor India : ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटर (MG Motor) भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) Comet EV लाँच करण्यास तयार आहे. एमजी मोटर इंडियाने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार MG Motor च्या इंटीरियरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून ही इलेक्ट्रिक कार हाय-टेक असेल याची कल्पना येतेय. कंपनीने शेअर केलेल्या फोटोनुसार, कंपनीने इंटिरियरला कमी चकचकीत करत स्लीक डिझाइन दिले आहे. या कारचं इंटिरियर काहीसं Apple iPods शी जुळते. या स्मार्ट स्टिअरिंग व्हीलद्वारे ऑडिओ माउंट कंट्रोल, नेव्हिगेशन आणि व्हॉइस कमांड ड्रायव्हरला नियंत्रित करता येणार आहे. 


Comet EV चे स्टियरिंग व्हील हे दोन-स्पोक स्टिअरिंग व्हील असून त्याच्या दोन्ही बाजूला कंट्रोल पॅनल देण्यात आलं आहे. कंपनी 10.25-इंचाच्या दोन मोठ्या स्क्रीनसह  Comet EV लाँच करेल, ज्यात टचस्क्रीन आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेचा समावेश असेल.


MG Comet EV मधील फिचर्सबाबत MG ने अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे दिलेली नाही, पण सुत्रांच्या अहवालानुसार, अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी,  इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, सीटबेल्ट रिमाइंडर, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांचा समावेश असू शकेल.


Comet EV च्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास, ही इलेक्ट्रिक कार आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या वूलिंग एयर ईवीवर आधारित आहे. या कारची लांबी 2,900mm असेल, 4 लोकांच्या आसनक्षमतेसह कंपनी ही कार लॉन्च करेल. कॉमेट ईवीची स्पर्धा टाटा टियागो ईवी (Tiago EV) आणि सिट्रोएन ईसी 3 (Citroen eC3) शी असणार आहे. 


कंपनीने Comet EV च्या बॅटरी पॅक आणि रेंजबद्दल अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह मार्केटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये, पहिला बॅटरी पॅक 25 kWh क्षमतेचा असेल आणि दुसरा बॅटरी पॅक 29 kWh क्षमतेचा असेल. रेंजबद्दल बोलायचे झाले तर, 25 kWh बॅटरी पॅक 150 ते 180 किमीपर्यंत तर दुसरा बॅटरी पॅक 29 kWh 200 ते 250 किमीपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे.


भारतीय बाजारपेठेतील कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता लक्षात घेता, कंपनी Comet EV कार 8 ते 10 लाख रुपयांच्या (Comet EV Price) सुरुवातीच्या किमतीसह बाजारात लॉन्च करू शकते. मात्र, एमजी मोटरकडून किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI