Mercedes Benz Vision EQXX : सध्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करतायत. याच विचाराने जर्मन लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज बेंझने (Mercedes Benz) काही काळापूर्वी देशातील सर्वाधिक रेंजमधील इलेक्ट्रिक कार (Electric Car) EQS 580 लाँच केली होती. या कारची फार चर्चा झाली. कारण, ही कार एका चार्जवर 857 किलोमीटर धावू शकते. आता कंपनीने एक पाऊल पुढे टाकत मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX (Mercedes Benz Vision EQXX) ही नवीन इलेक्ट्रिक कार देशात सादर केली आहे. ही कार एका चार्जवर 1000 किलोमीटरची रेंज देऊ शकते. 


पॉवरट्रेन कशी आहे?


या मर्सिडीज इलेक्ट्रिक कारमध्ये वीज कंपनीच्या कार्यक्षमतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे, जी 244hp पॉवर आउटपुट देते. या कारमध्ये 100 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार 900V पर्यंत फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. 


सूर्यप्रकाशाने चार्ज होणार 


या कारची रेंज वाढवण्यासाठी कारच्या अप्पर साईडला सोलर पॅनलही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या कारची रेंज दररोज 25KM पर्यंत वाढवता येऊ शकते. 


कारचे डिझाईन कसे आहे? 


मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX या मर्सिडीज कारचा लूक आणि डिझाईन अप्रतिम आहे. त्याच्या समोर एक विस्तृत LED लाईटबार देण्यात आला आहे. तसेच त्याच्या बोनेटवर कंपनीचा लोगो स्टिकर म्हणून देण्यात आला आहे. याबरोबरच यामध्ये फ्लश डोअर हँडल्स देण्यात आले आहेत, तसेच ही कार बनवण्यासाठी अनेक रिसायकल मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. कारचे वजन फक्त 1750 किलो आहे.


कोणाशी स्पर्धा करणार?


ही कार भारतातील Porsche Taycan शी स्पर्धा करेल. या कारमध्ये 79.2kWh आणि 93.4kWh चे दोन वेगवेगळे बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. रेंज आणि पॉवर आउटपुट व्हेरिएंट आणि बॅटरीच्या आकारानुसार बदलतात. चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर, ही कार एसी आणि डीसी दोन्ही चार्जरला सपोर्ट करते. कारला 800-व्होल्ट सुपर-फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टदेखील देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


धमाका! 5-डोअर Mahindra Thar 26 जानेवारीला सादर होणार; maruti jimny ला देणार जबरदस्त टक्कर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI