Electric Car Care : सध्या सगळीकडेच इलेक्ट्रिक बाईक Electric Car आणि कारची क्रेझ आहे. परवडणारी असल्यामुळे अनेकजण या  इलेक्ट्रिक बाईक आणि कार खरेदी करतात. मात्र वातावरणानुसार या कारमध्ये अनेक फरक जाणवू लागतात. त्यात हिवाळा असेल तर या गाड्यांची रेंज कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात जर  इलेक्ट्रिक बाईक आणि कार चालवत असाल तर तुम्हाला तुमच्या गाड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही काही साध्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. 


हिवाळ्यात उघड्यावर ईव्ही पार्क करू नका


लिथियम-आयन बॅटरी ऊर्जा साठवते ज्यामुळे ईव्ही चालते.  लिथियम-आयन बॅटरी कमी तापमानात खराब काम करते कारण  सेल्सचं इंटरनल रेसिस्टंस वाढतो, ज्यामुळे सफर कॅपॅसिटी कमी होते, बॅटरी वेगाने निघते आणि रिचार्ज होण्यास देखील जास्त वेळ लागतो. हे टाळण्यासाठी शक्य असल्यास आपली इलेक्ट्रिक कार उघड्यावर पार्क करू नका आणि जर आपल्याकडे फक्त आउटडोअर पार्किंग असेल तर थंडी टाळण्यासाठी रात्री झाकून ठेवा.



चार्जिंग करताना केबिन Pre-Heat करा


हिवाळ्यात बॅटरीची क्षमता कमी होऊ नये म्हणून वाहनात चार्जर लावताना केबिन प्रीहीट करावी. ईव्ही हीटर वापरल्याने बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच जर तुमच्या ईव्हीमध्ये गरम सीटचा पर्याय असेल तर तुम्ही याचाच वापर करावा. 


फास्ट चार्जरचा वापर कमी करा


वारंवार फास्ट चार्जिंग करणे कोणत्याही परिस्थितीत लिथियम-आयन बॅटरीसाठी चांगलं मानलं जात नाही आणि थंडीत ते अधिक हानिकारक ठरते. हिवाळ्यात शक्यतो फास्ट चार्जिंग टाळा कारण तापमानात घट झाल्यामुळे हाय रेसिस्टेंस  आपल्या बॅटरीच्या एकूण कॅपॅसिटीवर विपरीत परिणाम करू शकतो. 


बॅटरी 20 टक्क्यांपेक्षा कमी होऊ देऊ नका



आपल्या कारची बॅटरी 20% पेक्षा कमी होऊ न देण्यासाठी थंड हवामानापासून हा सर्वोत्तम उपाय आहे. या लेव्हलच्या खाली बॅटरी ठेवली तर बाईकची रिव्हर्स सायकल खराब होते. ज्यामुळे बॅटरी हळूहळू आपली चार्जिंग कॅपॅसिटी कमी होते. त्यात गार वातावरणात तर अजून परिणाम होतो. 


जर तुम्ही  इलेक्ट्रिक बाईक किंवा कार खरेदी केली असेल तर त्याची काळजी घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. तर वर दिलेल्या सगळ्या सोप्या टिप्स वापरुन तुम्ही तुमची  इलेक्ट्रिक बाईक किंवा कार सुरक्षित ठेऊ शकता. 


इतर महत्वाची बातमी-


Upcoming Cars from Hyundai and Maruti Suzuki : Maruti आणि Hyundai या वर्षी भारतात अनेक नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये खास काय असेल?


 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI