Tata Motors: कार उत्पादक टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी ही नेक्सॉनपासून (Nexon) ते हॅरियर (Harrier) आणि अगदी सफारीपर्यंतच्या (Safari) आपल्या सर्व गाड्या खास डिझाईन आणि फिचर्सने अपग्रेड करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी पुढील दोन ते तीन वर्षांत नवीन ICE SUV आणि इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) सिरीज लाँच करणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, टाटा मोटर्स (Tata Motors) 45,220 युनिट्सच्या कार विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाई (Hyundai) पहिल्या दोन स्थानांवर आहे.


नेक्सॉनने (Nexon) सर्वाधिक विक्री होणारी टाटा मॉडेल म्हणून आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. तर टाटा पंच, टाटा टियागो आणि टाटा अल्ट्रोझ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने हॅरियरच्या 2,762 युनिट्स आणि सफारी एसयूव्हीच्या 1,751 युनिट्सची विक्री केली. या दोन्ही कार लवकरच अपडेट केल्या जाणार आहेत. आता कोणत्या टाटा कारवर किती प्रतीक्षा कालावधी (Waiting Period) आहे, ते जाणून घेऊया.


टाटा गाड्यांसाठी वेटिंग पीरियड


टाटा हॅरियर प्री-फेसलिफ्ट मॉडेल्सवर 4 ते 6 आठवडे, टाटा सफारी प्री-फेसलिफ्ट मॉडेल्सवर 4 ते 6 आठवडे, टियागो पेट्रोलवर 4 आठवड्यांपर्यंत, टियागो सीएनजीवर 8 आठवड्यांपर्यंत, टाटा अल्ट्रोझ डिझेलवर 6 आठवड्यांपर्यंत , टाटा अल्ट्रोझ ​​CNG वर 6 आठवड्यांपर्यंत, टाटा पंच पेट्रोलवर 4 आठवड्यांपर्यंत, टाटा पंच CNG वर 12 आठवड्यांपर्यंत आणि नवीन टाटा नेक्सॉनवर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे.


टियागोला मोठी मागणी


टाटाची लोकप्रिय टियागो हॅचबॅक सध्या मुंबईत चार आठवड्यांच्या वेटिंड पीरियडवर उपलब्ध आहे. तर त्याच्या सीएनजी व्हेरिएंटसाठी ग्राहकांना आठ आठवडे प्रतीक्षा करावी लागू शकते. हॅचबॅक XE, XM, XT (O), XT, XZ+, XT NRG आणि XZ NRG सह विविध ट्रिम्समध्ये येते, या सर्वांना 1.2L रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन मिळतं.


पंच सीएनजीसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा


टाटा अल्ट्रोझच्या (Tata Altroz) डिझेल मॉडेलचा वेटिंग पीरियड  बुकिंगच्या तारखेपासून 6 आठवडे आहे, तर त्याच्या सीएनजी व्हेरिएंटसाठी वेटिंग पीरियड किंचित कमी करून 4 आठवडे करण्यात आला आहे. टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी पंच (Tata Punch), पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांसाठी अनुक्रमे 4 आणि 12 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे. तर Tata Nexon खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 6 ते 8 आठवडे प्रतीक्षा करावी लागू शकते. स्थान (Location), रंग (Colour) आणि प्रकारानुसार (Variant) सर्व कारच्या वेटिंग पीरियडमध्ये फरक असू शकतो.


हेही वाचा:


Odysse Vehicles: ई2गो इलेक्ट्रिक स्‍कूटरचं ग्रॅफिन व्‍हेरिएंट लाँच; किंमत फक्त...


Car loan Information:

Calculate Car Loan EMI