Maruti Jimny Unveiled: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मारूतीने आपली 5 डोअर जिम्नी (Maruti Jimny) कार अखेर सादर केली आहे.  जिम्नीची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून होत आहे, मारूती देशात या कारची विक्री नेक्सा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार आह. मारूतीची ही कार महिंद्राच्या थारला टक्कर देणारी आहे.


मारुती जिम्नी डिझाईन


मारूतीच्या या कारमध्ये पाच दरवाजे असणार आहे.  मारूची जिम्नी ऑफरोड  4X4 अंदाजात रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे ही कार इतर कारपेक्षा वेगळी ठरत आहे. मारूती जिम्नीचा लूक अतिशय आकर्षक आहे. जो नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहे. मारूतीची ही कार अनेकवेळा टेस्टिंगच्या दरम्यान स्पॉट केली आहे.


मारुती जिम्नी इंजिन


मारूतीने जिम्नीमध्ये अनेक बदल केले आहे. जिम्नीचे स्टेअरिंग व्हील वेगळ्या अंदाजात सादर केले आहे. जिम्नीमध्ये 1.5 L पेट्रोल इंजिन दिले आहे. जे हायब्रीडसह 102bhp पॉवर आणि 130Nm पीक टॉर्क प्रोड्युस करेल. या कारमध्ये 4-स्पीड ऑटोमेटिक (AMT)आणि 5-स्पीड मॅन्युएल (MT) गिअरबॉक्स दिले गेले आहेत. ऑफरोडिंगसाठी हा अनुभव जबरदस्त असणार आहे.


मारुती जिम्नीची किंमत


ऑफरोडिंग रस्त्यांचा विचार करत जिम्नी तयार करण्यात आली आहे. जिम्नीचा ग्राऊंड क्लिअरन्स देखील उत्कृष्ट आहे. मारूती जिम्नी  परवडेल अशा किंमतीत बाजारात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकांना ही कार घेता येणार आहे. 


मारूतीच्या या 5 डोअर जिम्नीची टक्कर थेट महिंद्रा अॅन्ड महिंद्राशी आहे. महिंद्रा आणि महिंद्रा देशात लोकप्रिय असून महिंद्राचा थेट सामना महिंद्रा थारशी होणार आहे


 18 जानेवारीपर्यंत ऑटो एक्स्पो


नोएडामध्ये देशातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.  जगभरातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक आधुनिक आणि नाविन्यपूर्ण गाड्याही बघायला मिळणार आहे.  18 जानेवारीपर्यंत ऑटो एक्स्पो चालणार  आहे.


इतर महत्त्वच्या बातम्या :


Maruti EVX Concept: EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकीचे पदार्पण, दोन वर्षात पहिली मारूती EVX येणार रस्त्यावर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI