Auto Expo 2023 Tata Motors: भारतातील सर्वात मोठी ऑटो आणि मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी Tata Motors ने बुधवारी ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्याच दिवशी भविष्यासाठी तयार, सुरक्षित, स्मार्ट आणि इको-फ्रेंडली वाहने आणि नवीन कॉन्सेप्ट कारची रेंज सादर केली. ही वाहने वैयक्तिक आणि सार्वजनिक गतिशीलता आणि मालवाहू वाहतूक पूर्णपणे बदलण्यासाठी डिझाइन केलेली आहे. अभियांत्रिकी आणि नवीन तंत्रज्ञानासह कंपनीने 'मेड इन इंडिया' उत्पादने सादर केली आहेत.
Auto Expo 2023 Tata Motors: जबरदस्त आणि दमदार; ऑटो एक्स्पो 2023 मध्ये Tata Curvv प्रदर्शित
Tata Curvv ऑटो एक्सपो 2023 मध्ये शोकेस करण्यात आली आहे. लाल रंगाची ही कार संपूर्ण शो मध्ये लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. ही टाटाची पेट्रोल व्हर्जन कार आहे.
Auto Expo 2023 Tata Motors: TATA ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली पहिली EV कार AVINYA केली प्रदर्शित
टाटाने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार AVINYA सादर केली आहे. टाटाची ही 5 सीटर कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार दिसायला जबरदस्त आहे.
Auto Expo 2023 Tata Motors: टाटाची इलेक्ट्रिक कार Harrier EV ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित
TATA Harrier EV Ca: टाटाने ऑटो एक्सपोमध्ये आपली आलिशान कार हॅरियरचा (TATA Harrier EV कार) EV व्हर्जन प्रदर्शित केला आहे.
Auto Expo 2023 Tata Motors: TATA ची नवीन इलेक्ट्रिक कार Sierra EV सादर
TATA ऑटो एक्सपो 2023 मध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार सादर करत आहे. यातच टाटाने नवीन इलेक्ट्रिक कार Sierra EV देखील प्रदर्शित केली आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI