Maruti Brezza Booking: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने अलीकडेच आपली अपडेटेड नवीन ब्रेझा लॉन्च केली होती. कंपनीच्या या कारला ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. लॉन्च झाल्यापासून देशात या कारला मोठी मागणी आहे. सप्टेंबरमध्ये या कारची 15,445 युनिट्स विकली गेली. गेल्या महिन्यात ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला Brezza च्या 75,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाल्या असून याच्या डिलिव्हरीसाठी कंपनी ग्राहकांना 30 आठवड्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा कालावधी देत ​​आहे.


मारुती सुझुकी ब्रेझा 1.5-लिटर K15C पेट्रोल इंजिनसह माईल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा इंजिन 103PS पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार Lxi, Vxi, Zxi आणि Zxi+ या चार ट्रिममध्ये येते.


फीचर्स 


या एसयूव्हीमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, शार्क फिन अँटेना, मागे एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील, यूएसबी पोर्ट,  सनरूफ असे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात स्मार्टफोन चार्जर, टाइप-ए आणि टाइप-सी, हेड-अप डिस्प्ले, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, एलईडी टेल लॅम्प सिग्नेचर सारखे फीचर्सही देण्यात आले आहे.


किंमत किती? 


 LXI प्रकारासाठी मॅन्युअल ट्रान्समिशनसह Brezza 1.5 पेट्रोल इंजिनची किंमत 7.99 लाख रुपय आहे, तर VXi प्रकारची किंमत 9.47 लाख रुपये आहे. ZXI प्रकारची किंमत 10.87 लाख रुपये,  ZXi ड्युअल टोन प्रकारची किंमत 11.03 लाख रुपये, ZXi+ प्रकारची किंमत 13.46 लाख रुपये आहे. तसेच 1.5 पेट्रोल इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या VXi व्हेरियंटची किंमत 10.97 लाख रुपये, ZXi व्हेरिएंटची किंमत 12.37 लाख रुपये, ZXi ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत 12.53 लाख रुपये, ZXi + व्हेरिएंटची किंमत 13.80 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत.


Tata Tiago EV ला मिळाली 10 हजार बुकिंग


ब्रेझा शिवाय Tata Tiago EV ला ही देशात मोठी मागणी आहे. कंपनीने 10 ऑक्टोबरपासून याची बुकिंग सुरु केली आहे. बुकिंग सुरु केल्यानंतर पहिल्याच दिवशी याच्या 10000 हुन अधिक युनिट्सची बुकिंग झाली आहे. दरम्यान, मारुती सुझुकी ब्रेझा ही भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सन, महिंद्रा XUV300, Hyundai Venue, Kia Sonet सारख्या कारशी स्पर्धा करते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tata Tiago EV Booking: ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी Tata Tiago EV ला मिळाली 10 हजार बुकिंग, किती आहे किंमत?


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI