Lexux Luxury Cars : गेल्या काही महिन्यांत भारतात अनेक वाहनांची (Car) निर्मिती करण्यात आली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची या वाहनांसाठीची मागणी देखील वाढत चालली आहे. नुकतीच भारतीय कार बाजारात आणखी एक लक्झरी कार (Luxury Car) वाढली आहे. लक्झरी कार निर्मात्या Lexus कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपली सर्वाधिक विक्री होणारी कार 2022 ES 300h दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. कंपनी 'मेड इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत ही कार भारतात तयार करणार आहे. या कारमध्ये 2487 सीसीचे चार सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. ही कार उत्पादक कंपनी 2017 पासून भारतीय बाजारपेठेत आहे. 


डिझाईन कशी आहे?


कंपनीने ही सेडान कार स्पोर्टी लूकमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कारला स्लोपिंग रूफ, फ्रंट बंपर, मस्क्यूलर बोनेट, सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) सह एलईडी हेडलाईट्ससह विस्तृत क्रोम-फिनिश सिंगल-फ्रेम ग्रिल मिळते. 17-इंच अलॉय व्हील्ससह बाण कापलेल्या तीक्ष्ण कडा, ब्लॅक-आउट रूफ, कारच्या बाजूला बाहेरील रीअर व्ह्यू मिरर (ORVM) उपलब्ध आहेत. कारच्या मागील बाजूस रॅप-अराउंड LED टेललाईट्ससह आकर्षक बंपर देखील मिळतो.


व्हेरिएंट्स किती आहेत?


भारतीय बाजारपेठेत ES 300h कारचे दोन व्हेरिएंट आहेत. 'Exquisite' आणि 'Luxury' आणि दोन्ही व्हेरिएंटमध्ये चार-सिलेंडर 2487 cc इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन कारला 176 hp ची कमाल पॉवर आणि 221 Nm चा पीक टॉर्क प्रदान करते. ही कार स्व-चार्जिंग, स्ट्रॉंग हायब्रिड सेडान आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 118 एचपी पॉवर जनरेट करते. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार केवळ 8.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.


कारचे फिचर्स कसे आहेत?


या कंपनीच्या कार उत्कृष्ट आराम, लक्झरी फीचर्स, जबरदस्त क्षमता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगल्या मानल्या जातात. या कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर सीट, डोअर पॅड, आर्मरेस्ट प्लेसमध्ये उत्तम दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. याची जाणीव नुसती पाहिल्यावरच होते. दुसरीकडे, या कारमध्ये Apple CarPlay, Android Auto सह मोठा 12.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, अॅम्बियंट लाइटिंग, मून रूफ, ऑप्टिट्रॉन मीटर यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील आहेत. याशिवाय या सेडानमध्ये ३४० एल बूट स्पेसही उपलब्ध आहे.


किंमत किती?


या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 'एक्सक्झिट' आणि 'लक्झरी' या दोन्ही मॉडेल्सची किंमत 59.71 लाख रुपये आणि 65.81 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.


भारतात मर्सिडीज-सी क्लास, बीएमडब्लू (BMW), आणि स्कॉडा या काही प्रमुख लक्झरी कार आहेत ज्यांची किंमत साधारण लेक्ससच्या बरोबरीनेच आहे.


महत्वाच्या बातम्या : 


First Ethanol Car Launched: इथेनॉलवर धावणारी पहिली कार भारतात लॉन्च, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचं स्वप्न साकार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI