मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी महिंद्राची XUV700 petrol ही कार लॉंच झाली आहे. या वर्षात ही कार सर्वात जास्त चर्चेत होती. चेन्नईमध्ये घेण्यात आलेली XUV700 ची ट्रायल ही डिझेल कारची होती. या ट्रायलच्या काही महिन्यानंतर आता महिंद्राने याच व्हर्जनमधील पेट्रोल कार बाजारात आणली आहे. तर जाणून घेऊया, कशी आहे Mahindra XUV700 petrol कार? 


Mahindra XUV700 मध्ये 2.0 लीटरचे mStallion पेट्रोल इंजिन आहे. हे 197bhp ची पावर आणि 380Nm पीट टॉर्क जनरेट करते. त्यासोबतच 2.0 लिटरचे mHawk डिझेल इंजिनचाही पर्याय  उपलब्ध आहे. 153bhp पेक्षा जास्त क्षमता आणि  420Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसह यात सहा स्पीड मैनुअर आणि सहा स्पीड अॅटोमेटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळतो. या कारमध्ये अॉल- व्हील ड्रायवट्रेनचाही पर्याय देण्यात आला आहे. 
 
XUV700 कारमध्ये मोठी 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्याबरोबरच महिंद्राच्या या SUV कारला लेव्हल 1 ADAS (अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) सुरक्षा तंत्रज्ञान देण्यात आले आहे. ज्यामध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. शिवाय कारला सात एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील आहेत.


XUV700 ही कार एकदम आकर्षक दिसत असून ही लॉंच होणे हा अनेक महिन्यानंतर ग्राहकांना सुखद धक्का आहे. कारचे डिझाईनही चांगले आहे.  XUV700 उंच स्टॅन्स आहे. कारच्या पुढे काळी चकचकीत लोखंडी जाळी आहे. यामध्ये थोड्याशा प्रमाणात क्रोम असून नवीन व्हर्जनमध्ये तो फार आकर्षक दिसत आहे. शिवाय DRLs सह C-आकाराचे हेडलॅम्प हे डिझाइनमधील सर्वात आकर्षक आहे. चाचणी करण्यात आलेल्या कारची चाके 18 इंच आहेत. 


मुख्य म्हणजे या स्टँडर्ड महिंद्रा कारमध्ये आत जाईल तसे फ्लश डोर हँडल पॉप आउट होतात. हे अधिक महागड्या SUV    दिले जाते. या फिचर्समुळे ग्राहक जास्तीत-जास्त आकर्षित होतील. XUV700 मध्ये इतर अतिशय महागड्या कारमध्ये असलेले एक वैशिष्ट आहे. ते म्हणजे कारमध्ये आत जाताना सीट मागे सरकते. हे फिचर्स ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. या कारला मर्सिडीज सारख्या दरवाजाच्या पॅडवरील स्विचेस देखील  आहेत.  


नवीन महिंद्रा इन्फोटेनमेंट सिस्टम अनेक अॅप्स ऍक्सेस करू देते. शिवाय अलेक्सा व्हॉईस असिस्टंटसारख्या सुविधा देते. कारच्या छतावर सोनी कंपच्या 12 स्पीकर्ससह 3D सिस्टीम आहे. त्याचा आवाज छान असून बाससुध्दा मस्त आहे. कारच्या वैशिष्ट्यांमधील हे एक उत्तम वैशिष्ट आहे.  


ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलमुळे उन्हामध्ये केबिन लगेच थंड होते. शिवाय यात एअर प्युरिफायरची सुविधा आहे. चालकाला याचा चांगला फायदा होईल. कारमध्ये उंच व्यक्तीसाठी लेगरूमची संख्या चांगली आहे. शिवाय रुंदीही खूप चांगली आहे. कारच्या सीट्स पक्क्या असून त्या पुरेसा आराम देतात. त्याबरोबरच मागे बसलेल्या प्रवाशांना अधिक जागा हवी असेल तर ते समोरच्या सीटला मागून सहज पुढे सरकवू शकतात. 


सुरक्षिच्या दृष्टीकोनातून विचार केला तर ही कार अत्यंत सुरक्षित आहे. यात 7 एअरबॅग्ज, स्टेयरिंग व्हील बटणांसह एक ADAS प्रणाली आहे. व्हॉइस स्पीडिंग अलर्ट, ऑटो बूस्टर हेडलॅम्प आणि 80 किमी प्रतितास पेक्षा जास्त मोडवर ऑटो हाय बीम असिस्टद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. हे ऑटो बूस्टर हेडलॅम्प चालकांसाठी उपयुक्त ठरतील. 


स्टेयरिंग खूप हलके आहे. त्यामुळे कार सहज पार्क करण्यास मदत होते. शिवाय ट्रॅफिकमध्ये कार चालवताना त्याचा चांगला फायदा होतो. कारचे वजन अजिबात जाणवत नाही. याबरोबरच XUV700 कारला चांगले मायलेज असून ट्र्र्रॅफिकमध्ये कार चालविली तर सहा ते आठ किलोमीटरचे अॅवरेज पडते. तर चांगल्या हायवेला 9 किमीच्या आसपास अॅवरेज पडते. तसेच हायवेला वेगाने ही कार चालविल्यास दहा किमीपर्यंत अॅवरेज पडते.  


XUV700 मध्ये तीन सीटच्या तीन लाईन, एक उत्कृष्ट पेट्रोल इंजिन आणि चांगल्या तंत्रज्ञानावर आधारीत केंद्रित इंटीरियर देखील देते. या कारची एक्स शोरून किंमत 21 लाख रूपये आहे. 
इतर बातम्या 


New MG Motor EV : MG Motor बाजारात आणणार नवी SUV


BMW iX Pics : इलेक्ट्रिक कार BMW iX चं लॉन्चिंग; भन्नाट फिचर्सची पर्वणी


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI