Scorpio N Delivery : महिंद्रानं (Mahindra) गेल्या महिन्यात 'बिग डॅडी' म्हणून प्रसिद्ध असलेली 'स्कॉर्पिओ एन' (Scorpio N) लॉन्च केली. ही SUV टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आली आहे. आता ग्राहकांना स्कॉर्पिओसाठी वाट पाहावी लागणार नाही, असं नुकतंच महिंद्रा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं 26 सप्टेंबरपासून बहुचर्चित एसयूव्हीची डिलीव्हरी सुरु करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी कंपनीनं खुलासा केला होता की, बुकिंग 'First Come First Serve' तत्त्वावर केली जाईल आणि डिलिव्हरीची तारीख वेगवेगळी असेल. कंपनीनं सांगितलं होतं की, नवीन स्कॉर्पिओ-एन तसेच स्कॉर्पिओच्या मागील मॉडेलची विक्रीही सुरू राहील.


Mahindra Scorpio N ची सुरुवातीची टेस्ट ड्राईव्ह 30 शहरांमध्ये सुरू झाली असून या महिन्यात 30 जुलैपासून ही गाडी बुक करता येणार आहे. देशातील या कारची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये टॉप व्हेरियंटनुसार वाढ होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत जाते. महिंद्रा 2022 मध्ये या SUV चे फक्त 20,000 युनिट्स आणणार आहे आणि या वर्षाच्या अखेरीस या सबयुनिट्सचं वितरण करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. 


'स्कॉर्पिओ एन'ची इंजिन पॉवर


ही SUV 2.0-लीटर Amstallion टर्बो पेट्रोल आणि 2.2 liter mHawk डिझेल या दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिन 200PS कमाल पॉवर आणि 380 Nm चा पीक टॉर्क निर्माण करू शकते, तर डिझेल इंजिन 175PS कमाल पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इन-क्लास शिफ्ट-बाय-केबल तंत्रज्ञानानं सुसज्ज 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायात उपलब्ध असतील.


फिचर्स काय? 


Mahindra Scorpio-N ला 7-इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एअर प्युरिफायर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, प्रीमियम 3D सोनी साउंड सिस्टम, बॉक्सी सिल्हूटसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल फ्रंट बंपर आणि केबिनमध्ये नवीन फ्रंट फॅशिया मिळाला आहे. 18-इंच ड्युअल-टोन अॅलॉय व्हील मोठ्या चाकांच्या कमानीसह ऑफर केले जातात. सुरक्षिततेसाठी, नवीन Scorpio N मध्ये हिल डिसेंट असिस्ट, 6 एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI