Volvo Price Hicked : स्वीडिश लक्झरी ऑटोमेकर व्होल्वोने (Volvo Car) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. खरंतर, कंपनीने आपल्या XC90, XC60 आणि XC40 च्या किंमती वाढवल्या आहेत. 'इनपुट कॉस्ट प्रेशर वाढल्यामुळे' किंमती वाढवण्यात आल्या आहेत. अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच, हा निर्णय नाईलाजाने घेण्यात आला आहे असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.


या मॉडेल्सच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही


कंपनीच्या काही मॉडेल्सच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ज्यामध्ये S90 पेट्रोल माईल्ड-हायब्रिड आणि XC40 पेट्रोल-हायब्रिडचा समावेश आहे. या गाड्या त्यांच्या जुन्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील.


आजपासून नवीन दर लागू होतील


कंपनीने कारचे वाढीव दर आजपासून म्हणजेच 25 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. 24 नोव्हेंबरपर्यंत बुक केलेल्या गाड्यांना जुने दर मिळणार असले तरी आज बुक करणाऱ्या ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे द्यावे लागतील.


नवीन किंमती


दरवाढीनंतर, XC40 रिचार्ज P8 Ultimate ची किंमत रु. 56.90 लाख, XC60 B5 Ultimate ची किंमत रु. 66.50 लाख आहे, तर XC90 B6 अल्टिमेटची किंमत रु. 96.50 लाख आहे.


कंपनी नवीन मॉडेल्सही आणणार आहे 


व्होल्वोने XC40 रिचार्ज, शुद्ध इलेक्ट्रिक SUV, XC90 SUV, मध्यम आकाराची SUV XC60, कॉम्पॅक्ट लक्झरी SUV XC40 आणि लक्झरी सेडान S90 यासह काही नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. माहितीनुसार, कंपनी आपल्या बेंगळुरू येथील प्लांटमध्ये सर्व पेट्रोल माइल्ड-हायब्रीड मॉडेल असेंबल करण्याचे काम करत आहे.


दोन तासांत 150 हून अधिक बुकिंग


XC40 रिचार्ज SUV ला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, देशात बुकिंग विंडो उघडल्याच्या पहिल्या दोन तासात 150 हून अधिक बुकिंग झाले आहेत.


महत्वाच्या बातम्या : 


Car Comparison: Tata Tiago CNG की Grand Nios i10 CNG? कोणती आहे बेस्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती


Car loan Information:

Calculate Car Loan EMI