2022 Maruti Suzuki Eeco: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार भारतात खूप पंसती केल्या जातात. मारुतीच्या अनेक अशा कार आहेत ज्या सामान्यांच्या खिशाला परवडतात. यातलीच मारुतीची एक कार आहे, ती म्हणजे Eeco MPV. कंपनीने आपली नवीन अपडेटेड 2022 Eeco MPV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 5.13 लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी ठेवली आहे. ही कर कंपनीने पेट्रोल आणि सीएनजी या दोन पराकारात लॉन्च केली आहे. नवीन इको ही जुन्या मॉडेलपेक्षा अधिक पॉवरफुल आणि जबरदस्त आहे. याच कारच्या किंमत फीचर्सबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.    

  


इंजिन 


कंपनीने यामध्ये 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन दिले आहे. जे आधीच्या मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या इंजिनापेक्षा खूप पॉवरफुल आहे. Dual Jet आणि Dual VVT तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन पेट्रोलमध्ये 80 bhp पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच CNG मध्ये 71 bhp पॉवर आणि 71 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार पेट्रोलमध्ये 25 टक्के अधिक मायलेज आणि सीएनजीमध्ये 29 टक्के अधिक मायलेज देणार, असा दावा कंपनीने केला आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये याचे मायलेज 20 किमी/लिटर आहे आणि सीएनजी मॉडेलमध्ये 27.05 किमी/किलो आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.


फीचर्स 


नवीन Eeco मध्ये ग्राहकांना डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर प्युरिफायर, रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स, नवीन स्टीयरिंग व्हील आणि मॅन्युअल एअर कंडिशनरसाठी रोटरी कंट्रोल्स सारखे फीचर्स मिळणार आहेत. तसेच अनेक सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहे. यात रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, हॅझार्ड स्विच आणि मागील स्लाइडिंग दारांसाठी चाइल्ड लॉक यासारख्या नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात ड्युअल एअरबॅग्ज, ABS-EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्सही आहेत.


या Eeco ला अधिक स्टायलिश बनवण्यासाठी ही कार नवीन मेटॅलिक ब्रिस्क ब्लू बॉडी कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. यासोबतच यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टिअरिंग व्हील आणि एसी आणि हीटरसाठी नवीन रोटरी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. Eeco च्या 7-सीटर स्टँडर्ड मॉडेलची किंमत 5.42 लाख रुपये आहे. तर याच्या  5-सीटर AC मॉडेलची किंमत 5.49 लाख रुपये असून याच्या 5-सीटर AC CNG मॉडेलची किंमत 6.44 लाख रुपये इतकी आहे. या सर्व एक्स-शोरुम किंमत आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI