Mahindra XUV300 Facelift Launch : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा (Mahindra) ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि परवडेल अशा किंमतीत अनेक नवनवीन कार बाजारात लॉन्च करत असते. तसेच, काही मॉडेल्स अपडेट करत असते. महिंद्राच्या मिड-लाईफ अपडेट व्हर्जनची टेस्टिंग सुरु आहे. महिंद्राची ही मिड-लाईफ कार नेमकी कधी लॉन्च होणार याचे काही डिटेल्स समोर आले आहेत. तसेच, एकदा ही कार लॉन्च झाल्यानंतर बाजारात ती कोणत्या कारशी स्पर्धा करणार या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कधी होणार लॉन्च?
महिंद्रा कार निर्माता कंपनी पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात आपली महिंद्रा XUV300 फेसलिफ्टच्या किंमती जाहीर करणार आहे. महिंद्राच्या XUV300 च्या सध्याच्या मॉडेलचे बुकिंग बंद झाल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. मागील महिन्यात, कंपनीने या संदर्भात सांगितलं होतं की, अपडेटेड मॉडेलसाठी जागा तयार करण्यासाठी विद्यमान मॉडेलचे उत्पादन कमी करण्यात आले आहे.
काय बदल होतील?
2024 त्याच्या आतील भागात मोठी टचस्क्रीन प्रणाली, नवीन फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील आणि नवीन गियर लीव्हर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, त्यात एक ADAS सूट देखील दिला जाऊ शकतो. तसेच, इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायांमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत. यात तीन इंजिन पर्याय आहेत, ज्यात दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन आहे. यामध्ये 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल युनिट (110 PS/200 Nm), 1.5-लीटर डिझेल इंजिन (117 PS/300 Nm) आणि TGDI 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (130 PS/250 Nm) यांचा समावेश आहे. ही सर्व इंजिने 6-स्पीड मॅन्युअलशी जोडलेली आहेत, तर डिझेल इंजिन आणि टर्बो-पेट्रोलमध्ये 6-स्पीड AMT पर्याय आहे.
कोणत्या कारशी स्पर्धा करणार?
नवीन Mahindra XUV300 भारतीय बाजारपेठेत Tata Nexon, Hyundai Venue, Maruti Suzuki Brezza, Nissan Magnite आणि Kia Sonet सोबत स्पर्धा करणार आहे. ज्यामध्ये Brezza आणि Magnite फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहेत, तर इतर सर्व मॉडेल्स डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. तर Nexon चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील बाजारात आहे. तुम्ही सुद्धा या कारच्या प्रतीक्षेत असाल तर लवकरच या कारची बुकिंग सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Hyundai Car Offer : मार्च महिन्यात Hyundai च्या गाड्यांवर मिळतेय बंपर ऑफर, तब्बल 43 हजार रुपयांपर्यंतची करा बचत; कारची लिस्ट पाहाच
Car loan Information:
Calculate Car Loan EMI