Hero Splendor Plus Price 2022: आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपली सर्वाधिक विक्री होणारी स्प्लेंडर प्लस बाईक एका नवीन आकर्षक रंगात बाजारात सादर केली आहे. कंपनीने ही बाईक सिल्व्हर नेक्सस ब्लू रंगात लॉन्च केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन रंगासह आता ही बाईक एकूण 6 रंगांमध्ये उपलब्ध झाली आहे. Hero Splendor Plus च्या कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ब्लॅक विथ पर्पल, ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, सिल्व्हर नेक्सस ब्लू, मॅट शील्ड गोल्ड आणि स्पोर्ट्स रेड विथ ब्लॅक.


इंजिन 


कंपनीने यात Hero Splendor Plus 97.2 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर, इंधन इंजेक्टेड इंजिन दिले आहे. जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये स्टार्ट-स्टॉप फीचर्ससह 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर Hero Splendor ला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग लोडेड सस्पेंशन आहे. ही बाईक फक्त ड्रम ब्रेक प्रकारात येते. कंपनी यात हॅलोजन हेडलाइट, टेल लाईट आणि इंडिकेटर दिले आहेत. या बाईकच्या नवीन मॉडेल्समध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.


व्हेरियंट आणि किंमत 


Hero Splendor Plus ची किंमत बेस व्हेरियंटसाठी 70,658 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी 72,978 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. Hero MotoCorp आपला इलेक्ट्रिक वाहन ब्रँड 'Vida' लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या ब्रँड अंतर्गत कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करणार आहे.


हिरो चित्तूर येथील ग्रीन फॅसिलिटीमध्ये त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू करणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Hero MotoCorp चे अध्यक्ष डॉ पवन मुंजाल यांनी कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या संकल्पना मॉडेलचे अनावरण केले होते. ही स्कूटर अतिशय स्लिम डिझाइनसह काळ्या आणि पांढर्‍या रंगासह दिसली. यात अलॉय व्हील्स देण्यात आले होते.


Hero MotoCorp ने ऑगस्ट 2022 मध्ये 4,62,608 युनिट्सच्या एकूण विक्रीसह 1.92% ची माफक वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 4,53,879 मोटारींची विक्री केली होती. देशांतर्गत बाजारात कंपनीने 4,50,740 युनिट्सची विक्री नोंदवली. जी ऑगस्ट 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 4,31,137 युनिट्सपेक्षा 4.55 टक्के जास्त आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI