Mahindra Zor Grand Electric 3-Wheeler: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने भारतात आपली नवीन तीन-चाकी इलेक्ट्रिक कार्गो झोर ग्रँड लॉन्च केली आहे. नवीन Zor Grand भारतात 3.60 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, बंगलोर) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीला झोर ग्रँडसाठी 12,000 पेक्षा जास्त युनिट्सचे बुकिंग आधीच मिळाले आहे. Mahindra Logistics, Magenta EV Solutions, YOLO EV आणि Jingo EV सारख्या कंपन्यांकडून Mahindra Zor Grand e-Cargo साठी बुकिंग प्राप्त झाले आहे.


महिंद्राचे 50,000 पेक्षा जास्त झोर ग्रँड ई-कार्गो भारतात विकण्याचे उद्दिष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्राची नवीन झोर ग्रँड कार्गो वाहने NEMO कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहेत. महिंद्राचा दावा आहे की हे प्लॅटफॉर्म वाहनाला सर्वोत्तम कार्यक्षमता प्रदान करते. झोर ग्रँड ई-कार्गो 12 kW लिथियम आयन बॅटरीसह लॉन्च करण्यात आली आहे. जी एका चार्जवर 100 किमीची रेंज देते. यात लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जे केवळ 4 तासांत बॅटरी पूर्णपणे चार्ज करते.


या ई-कार्गोमध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 50 एनएमचा टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. महिंद्राच्या म्हणण्यानुसार, हा ई-कार्गो आवाज करत नाही आणि गीअर्स नसल्यामुळे गाडी चालवणे खूप सोपे आहे. महिंद्राचा दावा आहे की, झोर ग्रँडची फ्रेम चांगल्या दर्जाच्या स्टीलची आहे. तर याची डिझाइन सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यास सक्षम आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकचा असाही दावा आहे की, कंपनी 800 हून अधिक ग्राहक संपर्क केंद्रे आणि वर्कशॉपमध्ये ई-कार्गो सेवा प्रदान करेल.


दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महिंद्रा समूहाने युनायटेड किंगडममधील बॅनबरी येथे महिंद्रा बॉर्न ईव्ही व्हिजनचे  (Mahindra Born EV Vision) चा खुलासा करत पाच इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले. या सर्व कार ऑल-न्यू INGLO प्लॅटफॉर्म आर्किटेक्चरवर तयार केलेल्या इलेक्ट्रिक SUV आहेत. M&M ने आपल्या नवीन डिझाइन सेंटर ऑफ एक्सलन्स, महिंद्रा Advanced Design Europe (MADE) चे उद्घाटन देखील केले. जे कंपनीच्या EV उत्पादनांच्या पोर्टफोलिओसाठी थिंक सेंटर म्हणून काम करेल. M&M ने म्हटले आहे की, M.A.D.E चे प्राथमिक उद्दिष्ट आहे, जे महिंद्रा ग्लोबल डिझाईन नेटवर्कचा भाग आहे. ज्यामध्ये मुंबईतील महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओचा समावेश आहे. 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI