BMW Bikes : BMW Motorrad India ने भारतीय बाजारपेठेत अपडेटेड G 310 बाईक रेंज सादर केली आहे. यामध्ये 2024 BMW G 310 R, G 310 GS, आणि G 310 RR नवीन कलर शेड्ससह लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने यासाठी बुकिंग सुरु केली आहे. याशिवाय ग्राहक आपल्या जवळच्या BMW Motorrad डीलरशिपवर जाऊन ते बुक करू शकतात. BMW बाईकच्या मॉडेलनुसार किंमतीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या.


BMW G 310 रेंज किंमत किती असेल?


BMW ने आपले नवीन 2024 G 310 R 2.85 लाख रूपये, G 310 GS 3.25 लाख रूपये आणि G 310 RR 3 लाखांना लॉंच केली आहे. बीएमडब्लू बाईकच्या या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.


2024 BMW G310 रेंज - नवीन काय असेल?


BMW च्या अपडेटेड G310 रेंजला नवीन कलर शेड्स मिळतात. G 310 R आता नवीन स्टाईल स्पोर्ट (रेसिंग ब्लू मेटॅलिक विथ पोलर व्हाईट) आणि स्टाईल पॅशन (ग्रेनाईट ग्रे मेटॅलिक) पेंट स्कीममध्ये उपलब्ध आहे. BMW G310 GS ADV नवीन शैलीतील रॅली पेंटवर्कमध्ये रेसिंग रेड कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. फुल-फेअर G310 RR ला नवीन कॉस्मिक ब्लॅक 2 कलर शेड देण्यात आला आहे.


BMW g 310 रेंज इंजिन


2024 BMW G 310 रेंजमधील इंजिन अपडेटेड ठेवण्यात आले आहे, जे 313cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. ही बाईक 33.5 bhp आणि 27 NM चा पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह संलग्न आहे. कंपनीने तिन्ही बाईक वेगवेगळ्या प्रकारे बदलल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या रेंजसह उत्तम परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहेत.


'या' बाईकबरोबर करणार स्पर्धा 


BMW G 310 रेंज देशांतर्गत बाजारात KTM 390 Duke, 390 Adventure, RC 390, Triumph Speed ​​400 आणि TVS Apache RR 310 या बाईकबरोबर स्पर्धा करणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Hyundai Creta Adventure Edition : Hyundai Alcazar आणि Creta च्या Adventure Edition चा टीझर रिलीज; जाणून घ्या काय असेल नवीन


Car loan Information:

Calculate Car Loan EMI