New Bikes : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल (Auto News) तर आज आम्ही तुम्हाला अशाच 5 शानदार मॉडेल्सबद्दल (Bike) सांगणार आहोत, जे मॉडेल्स जानेवारी 2024 मध्ये बाजारात लाँच करण्यात आले आहेत. या बाईक्स तुमच्या बजेटमध्येदेखील आहे आणि फिचर्सदेखील चांगले आहे.


हिरो एक्सट्रीम 125 आर (Hero Xtreme 125R )


हिरो एक्सट्रीम 125 आर मध्ये नवीन 125 सीसी एअर कूल्ड सिंगल सिलिंडर स्प्रिंट कॉम्बॅलन्स्ड इंजिन आहे जे 8250 आरपीएमवर 11.55 पीएसचा स्मूथ पॉवर रिस्पॉन्स आणि इन्स्टंट टॉर्क जनरेट करते. ही बाईक केवळ 5.9 सेकंदात 0-60 किमी प्रति तास वेग पकडू शकते आणि 66 किमी प्रति लीटर मायलेज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याची एक्स शोरूम किंमत 99,500 रुपयांपासून सुरू होते


 


होंडा एनएक्स 500 (Honda NX 500)


होंडा सीबी 500 एक्स प्रमाणेच NX500 मध्ये 471 सीसी, लिक्विड-कूल्ड पॅरेल-ट्विन इंजिन आहे जे 8,600 आरपीएमवर 47.5 पीएस पॉवर आणि 6,500 आरपीएमवर 43 एनएम टॉर्क जनरेट करते. यात असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हा एडीव्ही शोवा 41 मिमी इनव्हर्टेड फोर्क आणि 5-स्टेप प्रीलोड-अॅडजस्टेबल प्रो-लिंक मोनोशॉक सस्पेंशन सेटअपसह मिळणार आहे. याची एक्स शोरूम किंमत 5.90 लाख रुपये आहे.


Husqvarna Svartpilen 401



हस्कवर्ना स्वार्टपिलेन 401 मोटारसायकलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.92  लाख रुपये आहे. भारतात सिंगल व्हेरियंट आणि सिंगल कलरमध्ये उपलब्ध आहे. यात 398.63 सीसीबीएस6-2.0 इंजिन आहे जे 46 पीएस पॉवर आणि 39 एनएम टॉर्क जनरेट करते. यात फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. 


रॉयल एनफील्ड शॉटगन 650 (Royal Enfield Shotgun 650)


रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 3.59 लाख रुपये आहे. भारतात 3 व्हेरियंट आणि 4  रंगांमध्ये उपलब्ध असून त्याच्या हाय एंड व्हेरियंटची किंमत 3.73 लाख रुपये आहे. शॉटगन 650 मध्ये 648 सीसीबीएस6 इंजिन आहे जे 47.65 पीएस पॉवर आणि 52 एनएम टॉर्क जनरेट करते. यात डिस्क फ्रंट ब्रेक आणि डिस्क रियर ब्रेक देण्यात आले आहेत.


जावा 350 (Java 350)



जावा 350 मोटारसायकलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत2.15  लाख रुपये आहे. भारतात हा फोन 1 व्हेरियंट आणि 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. जावा 350 मध्ये 334 सीसीबीएस 6.20 इंजिन आहे जे 22.57पीएस पॉवर आणि 28.1  एनएम टॉर्क जनरेट करते. यात डिस्क फ्रंट ब्रेक आणि डिस्क रियर ब्रेक देण्यात आला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Black Box in Cars :  विमानात वापरली जाणारी 'ही' टेक्नॉलॉजी आता कारमध्ये येणार; अपघाताचं कारण लगेच कळणार!


 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI