Kia Sonet X-Line: Kia Sonet X-Line भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ज्याची किंमत 13.39 लाख रुपये आहे. कंपनीने ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह आणली आहे. डिझेल प्रकाराची किंमत 13.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Kia Sonet X-Line नवीन आकर्षक लुकसह आणली गेली आहे. त्यात अनेक कॉस्मेटिक बदल आहेत.

Kia Sonet X-Line च्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, ग्रिलला ग्लॉस ब्लॅक कलरमध्ये ठेवण्यात आले आहे आणि बाहेरील भाग ग्रेफाइट कलरमध्ये ठेवण्यात आला आहे. पुढील आणि मागील स्किड प्लेट्सला पियानो काळा रंग मिळतो. याच्या फॉग लॅम्पमध्ये ग्लॉस ब्लॅक कलर देखील देण्यात आला आहे. सॉनेट एक्स लाईनला ग्लॉस ब्लॅकमध्ये नव्याने डिझाइन केलेले 16-इंच अलॉय व्हील मिळतात. तर ब्रेक कॅलिपर सिल्व्हरमध्ये ठेवण्यात आले आहेत. जे GT व्हेरियंटवर लाल रंगात दिसत आहेत. एकूणच या X Line प्रकाराला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा रंग फक्त या प्रकारात देण्यात आला आहे.


सॉनेट एक्स लाईनच्या इंटीरियर नवीन ड्युअल टोन कलरमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय यात स्पोर्टी सीट्स मिळतात. ज्यात लेदर अपहोल्स्ट्री मिळते. त्यात रेड स्टिचिंग देखील केले गेले आहे आणि X-Line लोगो देखील दिसत आहे. याचे स्टीयरिंग व्हील देखील लेदरमध्ये रोल केलेले आहे. 


फीचर्स आणि इंजिन 


ही सॉनेटच्या GTX+ प्रकारावर आधारित आहे. ज्यामुळे यात एकसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. सॉनेट एक्स-लाइनमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो आणि ऍपल कारप्ले, युवो कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस फोन चार्जिंग, इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी, सॉनेट एक्स-लाइनला EBD सह ABS, सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण सारखे फीचर्स देण्यात आले आहे. इंजिन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. जो अनुक्रमे 7 DCT आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतो. याचे1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 117 Bhp पॉवर आणि 172 Nm टॉर्क, 1.5-लीटर डिझेल इंजिन 112 Bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. Kia Sonnet ची किंमत ऑगस्ट महिन्यातच 34,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI