BYD e6 vs Toyota Innova Crysta : जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) डिझेलचे बुकिंग बंद केल्यावर आता BYD ने खाजगी खरेदीदारांना e6 MPV विकण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी BYD कडील e6 फ्लीट पर्याय म्हणून उपलब्ध होता. पण, आता खाजगी खरेदीदारांना ते देखील मिळू शकते. इनोव्हा डिझेल बुकिंग पुन्हा सुरू होणार असताना टोयोटा आणि BYD कारची तुलना केली आहे.
कोणती कार सर्वात मोठी?
BYD e6 आणि Toyota Innova Crysta दोन्ही पूर्ण आकाराच्या MPVs आहेत. परंतु, इनोव्हाची लांबी 4735 मिमी आहे. तर, BYD e6 ची लांबी 4695 मिमी आहे. रूंदीने पाहिल्यास, BYD e6 ची रूंदी 1810mm आहे. तर, टोयोटा इनोव्हाची रूंदी 1830mm आहे. या दोन्ही कारमध्ये इनोव्हा 2750mm आणि e6 2800mm वर एक लांब व्हीलबेस आहे.
कोणती कार अधिक प्रशस्त आहे?
BYD e6 मध्ये मागील बाजूस खूप प्रशस्त जागा आहे. तसेच, या सीट्स खूप आरामदायी आहेत. इनोव्हाची सुद्धा मागील सीट खूप प्रशस्त आणि फोल्ड आउट टेबलसह कॅप्टन सीटसह आरामदायक आहे. दोन्ही MPV मध्ये मागील कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल यांसारखे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. BYD स्क्रीनसह Google Map सुद्धा दाखवते. तर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स यांसारख्या नवीन वैशिष्ट्यांसह इनोव्हाला गेल्या वर्षी अपडेट देण्यात आले होते.
कोणती कार सर्वात जास्त पॉवरफुल?
e6 मध्ये 71.7kWh बॅटरी पॅक आणि ब्लेड बॅटरी टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. एकूण पॉवर 95hp आणि 180Nm आहे. e6 मध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील आहे आणि ते DC फास्ट चार्जिंग किंवा AC फास्ट चार्जरद्वारे चार्ज केले जाऊ शकते. वेगवान एसी चार्जर कारला 2 तासात चार्ज करण्याची क्षमता आहे. गाडी चालवण्यासाठी, e6 एकदम स्मूथ आहे. इनोव्हामध्ये 2.4 लीटर डिझेल टॉर्क जनरेट करते. इनोव्हासुद्दा एक स्मूथ अनुभव देणारी आहे. यामध्ये 2.7l पेट्रोल इंजिन आहे. e6 च्या तुलनेत, इनोव्हामध्ये हेव्ही स्टीयरिंग आहे.
किंमत किती?
BYD e6 चे प्रमुख शहरांमध्ये मोजके डीलर्स आहेत आणि त्याची किंमत 29.15 लाख रुपये आहे. दुसरीकडे इनोव्हाची किंमत 17.8 लाख ते 26.5 लाख रूपयांच्या जवळपास आहे. BYD तुम्हाला थोडी महाग वाटू शकते. कारण यामध्ये तुलनेने इतके फिचर्स दिलेले नाहीत. मात्र, हायवे वर चालवण्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे. इनोव्हामध्ये अतुलनीय विश्वासार्हता, रिसेल व्हॅल्यू, अधिक डीलर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Mahindra & Mahindra च्या SUV XUV400 EV ची पहिली झलक; आनंद महिंद्रांकडून व्हिडीओ ट्वीट
- प्रतीक्षा संपली! आता 1 सप्टेंबरपासून आपल्या आवडत्या रंगात ऑर्डर करा Ola S1
Car loan Information:
Calculate Car Loan EMI