BMW Car Sales Report 2023 : लक्झरी कारसाठी ग्राहकांचे वाढते प्रेम (BMW) आणि आकर्षण बघून बीएमडब्ल्यू ग्रुपने भारतामध्ये मागच्या वर्षी, अर्थात 2023 मध्ये 14,172 युनिट्स लक्झरी कारची (Car Sales Report 2023) विक्री झाली होती. या विक्रीमध्ये 18 टक्क्याने अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सगळ्यात जास्त विक्री असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे 2024 मध्येही या लक्झरी कारची विक्री जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यावर्षी एक दोन नाही तर  BMW 19 कार लॉंच करणार आहे.


BMWने मिनीची 8,69 युनिट्स विक्री केली तर बीएमडब्ल्यूच्या टू व्हीलर ब्रँडने अर्थात मोटरराड ने 8,768 मोटरसायकलची विक्री केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023 मध्ये झालेली विक्री बीएमडब्ल्यू आणि मिनीसाठी चांगली ठरली. तसेच डिसेंबर 2023 मध्ये बीएमडब्ल्यू आणि मिनीसाठी आजपर्यंतची सगळ्यात जास्त मंथली विक्री झाली होती. एकंदरीतच कंपनीच्या या वर्षाच्या विक्रीमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 


जर लक्झरी ईवी सेगमेंट बद्दल बोलायचे झाले तर, iX सगळ्यात जास्त विकली गेलेली कार बनली आहे.तसेच बीएमडब्ल्यू ने सगळं मिळून 1474 विक्री केली.बीएमडब्ल्यू स्पोर्ट ऍक्टिव्हिटी व्हेहिकल्स (एसएव्ही) या एसयूव्हीने वार्षिक विक्रीमध्ये 54 टक्के आपलं योगदान दिलं . नवीन X1 ही 20 टक्क्यांनी कंपनीत सगळ्यात जास्त विकली जाणारी एसयूव्ही बनली आहे. तसेच X7 आणि सगळ्यात जास्त विकली जाणारी दुसरी लक्झरी कार मानली जाते. 


याचबरोबर नवीन बीएमडब्ल्यू 3 सिरीज कंपनीची सगळ्यात जास्त विकली जाणारी सेडान राहिली आहे. बीएमडब्ल्यू 2024 साठी आपला रोड मॅप तयार केला आहे, ज्यामध्ये ह्यावर्षी 5- सिरीज एक्स3 आणि नवीन मिनी सहित काही नवीन कार लॉंच केल्या जाणार आहेत. तसेच या वर्षापर्यंत दोन नवीन ईव्ही पण येणार आहेत. 


सगळ्या लक्झरी ऑटोमेकर्सच्या गाड्यांची विक्री चांगलीच वाढत आहे आणि ते एसयूव्हीच्या हाय डिमांड सोबत कायम आहेत. तसेच नवीन 3 सिरीज आणि 7 सिरीज सारखी सेडान जास्त पॉप्युलर बनली आहे. गेल्या वर्षी बीएमडब्ल्यू अनेक नवीन गाड्या लाँच केल्या होत्या आणि यावर्षी सगळ्या नवीन ब्रँडला घेऊन एकूण 19 गाड्या लॉंच होणार आहेत.


इतर महत्वाची बातमी-


SUV TATA Punch EV : भारतातली सगळ्यात लहान इलेक्ट्रिक कार SUV TATA Punch EV चे फिचर्स समोर, एकदा चार्ज केली की 300 किमी धावणार; किंमत किती असणार?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI